AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी आणि गुलाब पाण्याची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

सुंदर चेहरा कोणाला नको असतो. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपल्याकडे अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक प्रयत्न करूनही म्हणावी तशी त्वचा मिळत नाही.

केळी आणि गुलाब पाण्याची 'ही' पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 5:21 PM
Share

मुंबई : सुंदर चेहरा कोणाला नको असतो. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपल्याकडे अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक प्रयत्न करूनही म्हणावी तशी त्वचा मिळत नाही. मात्र, आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल केले तरी आपल्याला सुंदर त्वचा मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे आपली त्वचा कायमस्वरूपी सुंदर आणि तजेलदार दिसते. यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतील. (Facepack of banana and rose water is beneficial for the skin)

केळी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. हा पॅक तयार करण्यासाठी एक केळी आणि पाच चमचे गुलाब पाणी घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहऱा धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोनदा लावला तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, एक चमचा मध, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये मध, हळद, मुलतानी माती, दही, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा.

यानंतर ही पेस्ट वीस मिनिटे तशीच ठेवा आणि चेहऱ्यासोबत मानेवर लावा. मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा मुलतानी माती, 2 काप काकडी आणि 3 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Facepack of banana and rose water is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली