AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : सनस्क्रीन वापरताना तुम्हीही ‘या’ चुका करता का?, वाचा अधिक!

सनस्क्रीनचा वापर त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. आजच्या काळात सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही घराबाहेर जा किंवा नका जाऊ मात्र, आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावा. जर त्वचेला सनस्क्रीन लावली नाहीतर टॅनिंग, असमान त्वचा टोन, फिकट त्वचा आणि काळे डाग यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Skin Care : सनस्क्रीन वापरताना तुम्हीही 'या' चुका करता का?, वाचा अधिक!
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 10:46 AM
Share

मुंबई : सनस्क्रीनचा वापर त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. आजच्या काळात सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही घराबाहेर जा किंवा नका जाऊ मात्र, आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावा. जर त्वचेला सनस्क्रीन लावली नाहीतर टॅनिंग, असमान त्वचा टोन, फिकट त्वचा आणि काळे डाग यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या कोणत्या भागावर सनस्क्रीन लावली पाहीजे.

ओठ

आपण सर्वजण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो, पण ते ओठांवर लावत नाहीत. परंतु तुम्हाला विशेषतः ओठांना सूर्यापासून संरक्षण देणे आवश्यक आहे. त्वचेपेक्षा ओठ अधिक नाजूक असतात आणि ते लवकर खराब होतात. ओठांवर सनस्क्रीन लावण्यासाठी एसपीएफ युक्त लिप बाम वापरा.

कान

आपण अनेकदा शरीराच्या उघड्या भागावर सनस्क्रीन लावतो, पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की कान उघड्या भागात येतात. त्यावर आपण सहसा सनस्क्रीन लावत नाही. मात्र, कानालाही उन्हापासून संरक्षणाची गरज असते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीन लावाल तेव्हा ते कानालाही लावायला विसरू नका.

पापणी

तुम्ही तुमच्या पापण्यांवर सनस्क्रीन क्वचितच लावली असेल. साधारणपणे लोकांना डोळ्यांना सनस्क्रीन लागण्याची भीती असते. प्रत्येकाला वाटते की यामुळे डोळ्यांना नुकसान होते आणि म्हणून ते पापण्यांवरही लावू नका.  पापण्यांना देखील सनब्लॉकची आवश्यकता असताना, हे तुमच्या डोळ्यांना संरक्षण देते.

पाय

तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालताना पायाला सनस्क्रीन लावले असेल, पण तुम्ही कधी पायांच्या वरती सनस्क्रीन लावता का? आपण अनेकदा सैल चप्प घालतो आणि त्यामुळे पायांच्या वरती सनस्क्रीन लावण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. अशा स्थितीत पायांनाही सनस्क्रीन लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच