AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डैंड्रफ (Dandruff) पासून मुक्ती हवीय ? त्वरित करा हे उपाय

जर तुम्हाला कोंडेयााची समस्या वारंवार होत असेल, तर आहाराकडे व केसांच्या निगरानीकडे लक्ष द्या. योग्य प्रमाणात विटामिन बी2, बी3, बी6 आणि बी9 असलेले पदार्थ खाल्ल्यास केस आणि स्काल्प निरोगी राहते, आणि डैंड्रफपासून मुक्ती मिळते.नियमित आहारातील बदल आणि योग्य निगा ठेवून तुम्ही निरोगी आणि चमकदार केस मिळवू शकता!

डैंड्रफ (Dandruff) पासून मुक्ती हवीय ? त्वरित करा हे उपाय
| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 4:38 PM
Share

डोक्यात सतत खाज येतेय ? केसातली त्वचा कोरडी पडतेय ? छोटा छोटा कचरा जमा होतोय ? यालाच डोक्यात कोंडा म्हणजेच डैंड्रफ होणे बोलतात. आजच्या जगात डैंड्रफ ही एक सर्वसामान्य समस्या आहे परंतू फक्त हवेच्या प्रभावाने किंवा केसांची निगा न राखल्याने होत नाही. शरीरालील काही महत्वाच्या जीवनसत्त्वांची कमतरता देखील डैंड्रफच मुख्य कारण बनू शकते.

विशेषतः

विटामिन बी-कॉम्प्लेक्स (Vitamin B Complex)च्या कमीमुळे केसातील स्काल्प ड्राय होतो आणि शरीरातील याच सत्वांच्या कमीमुळे केसात खाज निर्माण होऊन डैंड्रफची समस्या अधिक तीव्र होते.म्हणून शरीराला रोजच्या रोज अवश्क पोषण मिळणे गरजेचे आहे.

डैंड्रफ आणि जीवनसत्त्व ‘बी-कॉम्प्लेक्समधील’ संबंध

१. विटामिन बी2 (रायबोफ्लेविन) – स्काल्प हेल्दी ठेवतो

विटामिन बी२ म्हणजे (रायबोफ्लेविन) हे केसातील त्वचेसाठी खूप गरजेचे आहे. याच विटामीनच्या कमतरतेमुळे स्काल्प ड्राय होतो आणि खाज वाढुन कोंड्याचे प्रमाण वाढते. रायबोफ्लेविन रक्तप्रवाह सुरळीत ठेवते व केसाची आणि त्वचेची आवश्यक ती नमी बनवून ठेवण्यास मदत करते.

विटामिन बी2ची कमी कशी भरून काढाल ?

अंडी , दूध, हिरव्या पाळेभाज्या, कडधान्य, ड्राई फ्रूट यांचा रोजच्या आहारात जास्त पटीने समावेश करा

२. विटामिन बी3 (नायसिन) – स्काल्पची नमी बनवून ठेवतो आणि केसाना योग्य ते पोषण मिळवून देतो

विटामिन बी3, ज्याला नायसिन अस ही म्हणतात, हा डोक्याची नमी बनवून ठेवतो व याच्या कमीमुळे त्वचा कोरडी पडून स्काल्पवर सूज येते. कोंडा वाढण्याची शक्यता वाढते.

विटामिन बी3 ची कमी कशी भरून काढाल ?

रोजच्या आहारात मासे, चिकण, डाळी, बटाटे खाल्ल्याने विटामिन बी3 ची पातळी सुरळीत राहते.

३. विटामिन बी6 (पायरीडॉक्सिन) – केसाची मजबुत ठेवण्यास मदत करतो

विटामिन बी6 (पायरीडॉक्सिन) केसांच्या त्वचेसाठी एक महत्वपुर्ण जीवनसत्त्व आहे. याची कमी असल्यास स्काल्पला जळजळ होते आणि केस खुप गळू लागतात.

विटामिन बी6 ची कमी कशी भरून काढाल?

रोजच्या आहारात ओट्स, शेंगदाणे, केळी, सोयाबीन,मासे, पालक हे उत्तम राहिल.

४. विटामिन बी9 (फॉलिक अॅसिड) – हा विटामिन केस गळती कमी करुन नवीन केसांच्या वाढीस मदत करतो

विटामिन बी ९ फॉलिक अॅसिड ची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात, केसात जळजळ होते आणि यामुळे कोंड्याची समस्या वाढू शकते.

कमी कशी भरून काढाल? हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, लिंबू सरबत, संत्री आणि विविध प्रकारच्या डाळी खाल्यास विटामिन बी9ची कमी पूर्ण होते

कोंड्यापासून बचाव करण्यासाठी आहारात काय खाणे वाढवावे

आहारात बदल करा-

जासतीत जास्त आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य,ओट्स, शेंगदाणे, सोयाबीन,मासे, डाळी, बटाटे व फळांमध्ये संत्री, केळी, सफरचंद अश्या गोष्टींचा समावेश करावा.

डैंड्रफ टाळण्यासाठी सोप्या टिप्स

१. बाहेर जाताना केस ढाकून ठेवा- वाढत्या ऊनामुळे व प्रदूषणामुळे केसात चिकचिक होऊन स्काल्प खराब होऊ लागतं. त्यामुळे घरातून बाहेर पडताना कधीही डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ बांधुन निघालेल उत्तम राहिल.

२. केस नैसर्गिक शैम्पूने धुवा – आजकालच्या कॅमिकलच्या जगात खूप प्रोडक्ट्सुमुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे कधीही डॅाक्टरांच्या सल्यानी हेअर केअर करणे योग्य.

३. नियमित तेल लावा – खोबरेल, बदाम किंवा ऑलिव्ह तेल केसांना पोषण देऊन कोरडेपणा दूर करतो.

४. स्ट्रीट फूड व जंक फूड खाणे टाळा अनहेल्दी आहार स्काल्पच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो त्यामुळे कधीही घरच जेवन खाणे याग्य.

५. केस कोमट पाण्याने धुवा – जास्त गरम पाणी स्काल्पला कोरडे करते आणि डैंड्रफ वाढतो. किंवा जास्त थंड पाणी केस गळती वाढवू शकतो म्हणून कधीही कोमट पाण्याने धुने योग्य.

६. ओल्या केस विंचरू व झटकू नये- ओले केस झटकल्याने केस गळती होता व केस कोरडी पडून त्यात कोंडा वाढतो.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.