Benefits Of Ghee | दाट आणि चांगले केस पाहिजे आहेत?, पाहा खास टिप्स

तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:00 AM, 6 Mar 2021
Benefits Of Ghee | दाट आणि चांगले केस पाहिजे आहेत?, पाहा खास टिप्स
हेअर केअर

मुंबई : तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. बरेच लोक तूप खाणे टाळतात कारण तूपामुळे लठ्ठपणा वाढतो. पण तूप केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस चांगले होतात. हिवाळ्यात, केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. (Ghee is beneficial for thick and soft hair)

-जर आपल्या केसांना दोन तोंड येत असतील तर यामुळे आपल्या केसांची वाढ देखील थांबते. म्हणून आपण दररोज आपल्या केसांना तूप लावून मालिश करणे महत्वाचे आहे.

-तुमच्या डोक्यात कोंडा झाला असेल तर तुपामध्ये बदामाचे तेल मिसळा आणि केसांच्या मुळांवर मालिश करा. यामुळे लवकरच कोंडा तुमच्या केसांमधून नाहीसा होईल.

-जर आपले केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर तूपात ऑलिव्ह तेल मिसळा आणि आपल्या केसांवर मालिश करा.

-आपले केस कोरडे व निर्जीव होत असतील तर तूप यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तूप हलके गरम करा आणि आपल्या केसांची मालिश करा आणि नंतर लिंबाचा रस घाला. अर्ध्या तासानंतर आपले केस धुवा.

-जर तुम्हाला केस लांब करायचे असतील तर मग तुपामध्ये आवळा किंवा कांद्याचा रस मिसळून मालिश करा यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होते.

-आवळा एक असा आहे ज्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर मिळतात. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. रोज आवळा खाल्याने तुम्ही बर्‍याच आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याचा रस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसाच खाऊ शकतात. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण कच्चा आवळा खाल्लातर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दुर राहू शकता.

संबंधित बातम्या : 

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

Fitness | जिममध्ये घाम गाळूनही ‘बॉडी’ बनत नाहीय? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

(Ghee is beneficial for thick and soft hair)