Skin care : त्वचेचा रंग उजळवण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

तूप औषध म्हणूनही वापरले जाऊ शकते. हे आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तूप वापरल्याने चेहरा चमकदार राहतो. याशिवाय तूप आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

Skin care : त्वचेचा रंग उजळवण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे!
तूप

मुंबई : तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे. तूप औषध म्हणूनही वापरले जाऊ शकते. हे आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तूप वापरल्याने चेहरा चमकदार राहतो. याशिवाय तूप आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर आपण केसांना तूप लावले पाहिजे. तसेच तूप आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. (Ghee is extremely beneficial for improving skin tone)

चमकदार त्वचेसाठी

त्वचा चमकदार तयार करण्यासाठी 2 ते 3 थेंब तूप आपण त्वचेला लावून मालिश केली पाहिजेत. तूपाने चेहरा मालिश केल्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा, यामुळे आपला चेहरा चमकदार आणि सुंदर दिसतो.

तेलकट आणि कोरडी त्वचा

बहुतेक लोक तेलकट आणि कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात. या हंगामात तेलकट त्वचा आधीपेक्षा जास्त तेलकट होते. यामुळे त्वचेचा रंग फिकट पडतो. या हंगामात तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तूप फेसपॅक अत्यंत आवश्यक आहे.

केसांना डीप कंडीशनिंग करते

रात्रभर केसांची सखोल कंडिशनिंग करायची असेल तर आपल्या केसांना तूप लावा. मग शॉवर कॅपने डोके झाकून सकाळी उठून आपले केस धुवा.

केसांची वाढ होते

गरम तुपाने स्कल्प मालिश केल्याने केवळ डोक्यात ब्लड सर्कुलेशन सुधारत नाही तर केस काळे आणि दाट होतात. जर केसांची वाढ कमी होत असेल तर तूप लावून मालिश करा.

त्वचा हायड्रेटेड राहते

तूपामध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत जे आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. विशेषत: उन्हाळ्यात जेव्हा शरीर सहजपणे डिहायड्रेट होते. तेंव्हा तूप खाल्ल्याने तुमची त्वचा मऊ आणि चांगली होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

(Ghee is extremely beneficial for improving skin tone)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI