ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेचा समस्या दूर करा!

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, हे सर्व करूनही आपल्याला हवी असलेली त्वचा मिळत नाही.

ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेचा समस्या दूर करा!
फेसपॅक

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करतो. मात्र, हे सर्व करूनही आपल्याला हवी असलेली त्वचा मिळत नाही. जर आपल्याला नैसर्गिकरित्या आणि कायमसाठी सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. (Green tea and Multani Mitti face pack are beneficial for the skin)

चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण त्वचेसाठी ग्रीन टी, मुलतानी माती आणि लिंबाचा फेसपॅक वापरला पाहिजे. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी, गुलाब पाणी आणि चंदन पावडरचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला तीन चमचे थंड झालेली ग्रीन टी, दोन चमचे गुलाब पाणी आणि चार चमचे चंदन पावडर लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ग्रीन टी आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर किमान 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health Tips | कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायी, जाणून घ्या कसे!

Skin Care : तेलकट त्वचेमुळे पिंपल्सची समस्या वाढत आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा!

(Green tea and Multani Mitti face pack are beneficial for the skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI