तरुणपणी डोक्यावर टक्कल पडत चाललंय? असू शकतात ‘ही’ तीन कारणे
प्रत्येकाला केस गळतीची चिंता सतत सतावत असते. यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण तुमचे केस का गळत आहेत हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे.
आजच्या काळात बहुतेक लोकं हे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बाजारात आलेल्या शॅम्पू, तेल, सीरम आणि कॅप्सूलपर्यंत एकापेक्षा एक महागडी उत्पादने लोकं वापरत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील या समस्या दूर करण्यासाठी DIY हॅक्सचे व्हिडीओ भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे लोक केस गळण्याच्या समस्या रोखण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा या संभ्रमात पडली आहेत. पण जर तुम्ही केस गळण्यामागचं नेमकं कारण शोधलं, तर त्यानुसार तुम्ही केस गळती रोखण्यासाठी उपाय करू शकता.
प्रत्येकाला केस गळतीची चिंता सतत सतावत असते. यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण असे असूनही अनेकदा योग्य रिझल्ट मिळत नाही. तुमचे केस का गळत आहेत हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया केस गळण्यामागील मुख्य तीन कारणे कोणती आहेत.
केस गळतीमागील तीन कारणं
– केस गळण्याचे मुख्य कारण बघायला गेलं तर आपले शरीरचक्र योग्य नसणे. जसं कि नाश्त्यापासून ते जेवण योग्य वेळी न करणे, रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे. तसेच योगा, वर्कआऊट किंवा वॉक काहीही न करणे. यामुळे आपली दिनचर्या खूप सुस्त होते. यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य बिघडते. तसेच आपल्या शरीराला पोषक आहार न मिळाल्याने केस गळणे सुरु होते. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन दिनचर्या सुधारणे महत्वाचे आहे.
– केस गळण्याचे एक कारण म्हणजे केसाना अधिक प्रमाणात उष्णता लागणे, जसे की हेअर स्टायलिंग टूल्सचा जास्त वापर केल्याने केस गळती होण्यास किंवा केस पातळ होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही गरम पाण्याने केस धुत असाल तरीही तुमचे केस गळू शकतात. यामुळे तुमच्या क्युटिकल्सचे नुकसान होते आणि केस खराब होतात. याशिवाय बाहेर पडताना केस झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अतिनील किरणांमुळेही केसांचे नुकसान होते.
-तुम्ही जर योग्य पद्धतीने आहाराचे सेवन केल्यास शरीराला योग्य पोषण मिळते. त्यात तुम्ही बाहेरील जेव्हा जंक फूड तसेच शिळे अन्न, व आहारात अधिक मीठ, साखरेचे प्रमाण खाल्ले तर तुमचे केस गळायला लागतात. आरोग्याला नुकसान पोहोचवणारे अन्न पदार्थ खाल्ल्याने शरीराला नीटसे पोषक द्रव्ये मिळत नाहीत, यामुळे केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय शरीराला योग्य आहार न मिळाल्याने हार्मोनल असंतुलन होऊन आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. यामुळे तुमची केसगळती झपाट्याने होऊ शकते.