आळीव आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या कसे?

आपल्यापैकी बरेच जण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आळीव घेतात. यात अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात जी रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात.

आळीव आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या कसे?
फेसपॅक

मुंबई : आपल्यापैकी बरेच जण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आळीव घेतात. यात अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात. जी रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? की ते आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये लिग्रान आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. त्यात फॅटी अॅसिड असतात जे त्वचेला पोषण, हायड्रेटेड आणि मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करतात. आळीव हे एक सुपर फूड आहे जे त्वचेला पोषण देण्याचे काम करते. (Halim seeds are extremely beneficial for the skin)

आळीवचे जेल

यासाठी तुम्ही 2 कप पाणी आणि अर्धी वाटी आळीव घ्या. या दोन्ही गोष्टी मध्यम आचेवर शिजवा आणि लाकडी चमच्याने सतत ढवळत राहा. जेव्हा पांढरे फोम दिसू लागतात, तेव्हा गॅस बंद करा आणि सुमारे 20 ते 30 मिनिटे थंड होऊ द्या. सुती कापडाच्या साहाय्याने, मिश्रण जेलपासून वेगळे करा आणि ते हवाबंद डब्यात ठेवा. हे जेल तुम्ही एका महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुमची त्वचा निर्जलीकरण आणि निर्जीव वाटते तेंव्हा हे मिश्रण वापरा. कापसाच्या मदतीने जेल लावा आणि सुमारे 30 मिनिटांनी पाण्याने धुवा.

आळीवचा फेसपॅक

हे तुमच्या त्वचेमध्ये कोलेजन बूस्टिंग पॅक म्हणून काम करते. हा फेसपॅक लावून सुरकुत्या बारीक रेषा कमी करण्यास मदत होते. एक भांड्यात आळीव घ्या आणि ते एक कप पाण्यात मिसळा. हे रात्रभर पाण्यात सोडा आणि सकाळी उठून त्याचा पॅक म्हणून वापर करा. हा फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचे मध, अर्धा चमचा ऑलिव तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल करावे. या सर्व गोष्टी मिसळून जाड पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. हा फेस पॅक लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या दूर होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Halim seeds are extremely beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI