घरच्या घरी केराटिनसारखे मऊ आणि चमकदार केस हवेत? तर केसांना लावा ‘हे’ हेअर मास्क
बरेचजण केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी महागडे केसांचे ट्रिटमेंट घेतात. पण काही काळांतराने या उपाचाराचे दुष्परिणाम केसांवर होत असतात. अशातच तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या या गोष्टी वापरून तुम्ही तुमचे कोरडे केस मऊ आणि चमकदार करू शकता. यामुळे तुमच्या केसांना पोषण देखील मिळेल, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास देखील मदत होऊ शकते. चला तर मग आजच्या या लेखात आपण नैसर्गिक घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात...

प्रत्येक महिलेला तिचे केस मऊ आणि चमकदार असावे असे वाटत असते. यासाठी अनेकजण महागड्या उपचार केसांवर करत असतात, त्यापैकी एक म्हणजे केराटिन ट्रीटमेंट. तर ही ट्रीटमेंट केसांना गुळगुळीत, सरळ आणि चमकदार बनविण्यास मदत करते. परंतु ही केसांची ट्रीटमेंट थोडी जास्त खर्चिक असते. त्यात अनेक प्रकारची कॅमिकल वापरली जातात, ज्यामुळे काही महिला केराटिन ट्रीटमेंट करण्यास टाळाटाळ करतात. अशावेळेस तुम्ही काही घरगुती उपाय देखील केसांना मऊ आणि चमकदार बनविण्यास मदत करू शकतात.
केस मऊ करण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचे मिश्रण करून हेअर मास्क बनवू शकता. यामुळे केस मजबूत होण्यासही मदत होईल. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे हेअर मास्क वापरू शकता. यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि मऊ होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग आजच्या या लेखात नैसर्गिक पद्धतीने केस कसे चमकदार आणि मऊ करता येतील कोणते घटक वापरून हेअर मास्क तयार करायचा ते जाणून घेऊयात…
अंड्याचा हेअर मास्क
अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही त्याचा हेअर मास्क बनवून केसांना लावू शकता. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी 1 अंडे, केळी, 4 चमचे दूध आणि 3 चमचे मध मिक्स करून हेअर मास्क बनवा. त्यात तुम्ही 3 चमचे ऑलिव्ह ऑइल देखील टाकू शकता. हा हेअर मास्क केसांवर 20 ते 25 मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा. यामुळे कोरडेपणा कमी होण्यास आणि केस मऊ होण्यास मदत होते. तुम्ही आठवड्यातून एकदा या मास्कचा वापर करू शकता.
कोरफड जेल आणि नारळ तेल
कोरफड आणि नारळ तेल दोन्ही केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. यासाठी कोरफड जेल आणि नारळाचे तेल दोन्ही एकत्र करून हेअर मास्क बनवता येतो. ताजे कोरफड जेल घ्या आणि त्यात नारळ तेल घालून पेस्ट बनवा. तुम्ही जेल आणि नारळाचे तेल व्यवस्थित मिक्स होण्यासाठी ग्राइंडर देखील वापरू शकता. आता ते तुमच्या केसांवर 20 ते 30 मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा. यामुळे केस मजबूत आणि मऊ होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही आठवड्यातून दोनदा या मास्कचा वापर करू शकता.
कांद्याचा रस
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस देखील फायदेशीर आहे. तुम्ही कांद्याच्या रसात कोरफड जेल किंवा नारळाचे तेल मिसळून केसांना लावू शकता. 2-3 चमचे कांद्याच्या रसात 2-3 चमचे कोरफडीचे जेल मिक्स करा. आता हा हेअर मास्क तुम्ही तुमच्या केसांना 25 ते 30 मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होऊ शकते. हे हेअर मास्क लावण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा. जर ते तुम्हाला सुट करत असेल तरच ते तुमच्या केसांना लावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
