नखं कापताना या गोष्टी लक्षात ठेवा, नखं दिसतील सुंदर आणि राहतील निरोगी!
सर्वसामान्यपणे आपण नखं फक्त सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहतो, पण त्यांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य वेळ, योग्य साधनं, आणि योग्य पद्धती वापरून नखं कापली तर ती केवळ सुंदरच नाही, तर निरोगीही राहतात. म्हणूनच पुढच्यावेळी नखं कापताना या गोष्टींकडे लक्षात द्या आणि तुमच्या नखांची परिपूर्ण पणे देखभाल करा...

नखं आपल्या शरीराच्या आरोग्याचं आरसंच असतात. मात्र त्यांची योग्य काळजी न घेतल्यास नखं कोरडी, तुटकी, आणि अशुद्ध होऊ शकतात. अनेकदा लोक नखं कापताना घाई करतात किंवा चुकीच्या पद्धतीने कापतात, ज्यामुळे नखांना इजा पोहोचते. म्हणूनच नखं कापताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खाली दिलेले काही टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नखांची योग्य देखभाल करू शकता.
• कोरडी नखं कापू नका
बऱ्याच वेळा लोक कोरडी नखं थेट कापतात. पण कोरडं नखं खूप नाजूक असतं आणि कापताना तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नखं कापण्याआधी त्यांना थोडं मऊ करावं, म्हणजे गरम पाण्यात ५-१० मिनिटं बुडवणं ही एक चांगली पद्धत आहे. यामुळे नखं लवचिक बनतात आणि सहज कापता येतात.
• अनेक शेपमध्ये नखं कापणं टाळा
फॅशनच्या नादात बरेच लोक आपल्या नखांना वेगवेगळ्या आकृती देण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे नखं कमकुवत होतात. वारंवार शेप बदलल्यास नखांच्या कडांवर दबाव येतो आणि ती तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो एकच नैसर्गिक आकार टिकवावा.
• क्यूटिकल्सची घ्या काळजी
नखांच्या कडांवर असलेली क्यूटिकल त्वचा नखांना जंतूंपासून वाचवते. क्यूटिकल्स कापू नयेत किंवा जबरदस्तीने ढकलू नयेत. यामुळे त्वचेला इजा होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी सौम्य क्रीम लावून त्या मऊ कराव्यात आणि सौम्यपणे मागे ढकलाव्यात.
नखांची ट्रिमिंग नियमित करा
नखं खूप वाढली की त्यांचं तुटणं, वाकणं किंवा त्यामध्ये घाण साचणं सुरु होतं. त्यामुळे दर ७-१० दिवसांनी नखं ट्रिम करावीत. मात्र, खूप खोलवर किंवा कापताच कापताच त्वचेपर्यंत नेऊ नये. नखं थोडीशी मोकळी जागा ठेवून कापावीत, जेणेकरून त्वचेला इजा होणार नाही.
• नेलकटर शेअर करू नका
स्वच्छतेच्या दृष्टीने नेलकटर एकमेकांबरोबर शेअर करणं टाळावं. कारण यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल संसर्ग पसरण्याची शक्यता असते. प्रत्येकाने स्वतःचा वेगळा नेलकटर वापरणं हा सर्वोत्तम उपाय आहे.
• मॉइश्चरायझर लावायला विसरू नका
नखं आणि आजूबाजूच्या त्वचेला योग्य पोषण देण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. विशेषतः नखं कापल्यानंतर आणि हात धुतल्यानंतर हातांवर व नखांवर मॉइश्चरायझर लावावं. यामुळे नखं कोरडी पडत नाहीत आणि फाटण्यापासून संरक्षण मिळतं.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
