AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Remedies For Cracked Heels : पायांच्या भेगांमुळे झालात हैराण ? सोप्या, घरगुती उपायांनी आराम मिळवा…

पायाच्या टाचांना भेगा पडल्याने, त्यातून रक्त येण्याच्या समस्येमुळे अनेक लोक हैराण असतात. पण काही सोप्या, घरगुती उपायांनी या समस्येवर नक्कीच मात करता येऊ शकते. रोजच्या रोज हे उपाय केल्यास पायांच्या भेगांची समस्या कायमची संपेल.

Home Remedies For Cracked Heels : पायांच्या भेगांमुळे झालात हैराण ? सोप्या, घरगुती उपायांनी आराम मिळवा...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 06, 2022 | 10:26 AM
Share

मुंबई :  ‘आपके पैर जमीन पर मत रखिए, मैले हो जाएंगे’, पाकिजा चित्रपटातला हा डायलॉग ऐकायल खूप छान वाटतो. प्रत्यक्षात मात्र असं करणं कठीणच. कारण आपला निम्मा कार्यभार हे पायच सांभाळत असतात. मात्र याचा पायांच्या भेगांमुळे (Cracked Heels),त्यातून रक्त येण्याच्या समस्येमुळे खूप हैराण व्हायला होतं. पायांना भेगा पडण्याची अनेक कारणं असू शकतात. वाढत्या वजनामुळे पायावर दाब पडणं, ब-याच वेळेसाठी उभं राहून काम करणं, कोरडी त्वचा (dry skin),खुल्या चपला किंवा सॅंडल्स घालणं अशा अनेक बाबींमुळे पायाला भेगा पडू शकतात. पायाची योग्य रितीने काळजी न घेतल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. दरवेळेस पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणं शक्य होत नाही. तरीही आपण घरी काही सोपे, घरगुती उपाय (home remedies) करूनही भेगांच्या समस्येवर सहज मात करू शकतो.

पाय स्वच्छ ठेवा

पायांच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नीट स्वच्छता राखणे. भेगांमध्ये अनेक वेळेस माती, धुलीकण अडकते व पायांना आणखी त्रास होते. त्यामुळे भेगा वेळच्यावेळी, नीट स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात सैंधव मीठ आणि थोडा शांपू घाला. हे मिश्रण नीट मिसळून त्यात पाय थोडा वेळ बुडवून ठेवा. नंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा. यामुळे पाय स्वच्छ होतात, त्यातील घाण आणि मृत पेशीही निघून जातात.

मध आणि दुधाचा वापर करा

मध आणि दूध जितकं आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त तितकंच आपल्या पायांसाठीही फायदेशीर असतं. मधामुळे त्वचेचं पोषण होतं. एका भांड्यात मध आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. त्यानंतर त्यामध्ये संत्र्याचा रस मिसळा. गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या. तयार झालेले हे क्रीम एका डबीत भरून ठेवा. हे क्रीम रोज पायाच्या भेगांना लावून हळुवारपणे मालिश करा. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

पायांना नियमितपणे मॉईश्चरायजर लावा

भेगांपासून आराम मिळवायचा असेल तर पायांना नियमितपणे मॉईश्चरायजर लावणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉईश्चरायजर लावावे. पायांसाठी नारळाचे तेल खूप उपयोगी असते. रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळाच्या तेलाने मसाज करा. त्यामुळे पायांच्या भेगा तर कमी होतीलच पण पाय मऊही होतील.

ग्लिसरीनचा वापर करा

पायाच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा वापरही करू शकता. ग्लिसरीन शरीरात मॉईश्चर टिकवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाला जिथे भेग पडली असेल तिथे ग्लिसरीन लावा. त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही मिसळू शकता. यामुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम