AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips: सिल्की आणि मजबूत केसांसाठी किचन मधील ‘ही’ एक गोष्ट वापरून पहा.. तुमच्या केसांच्या सर्व समस्यांवर आहे रामबाण उपाय!

Fenugreek Seeds For Hair Growth: पावसाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत केस दाट आणि सील्की बनवण्यासाठी मेथी दाणे खुप उपयोगी ठरू शकतात. जाणून घ्या, केसांसाठी मेथीचे फायदे आणि ते वापरण्याच्या पद्धती.

Hair Care Tips: सिल्की आणि मजबूत केसांसाठी किचन मधील ‘ही’ एक गोष्ट वापरून पहा.. तुमच्या केसांच्या सर्व समस्यांवर आहे रामबाण उपाय!
| Updated on: Jul 05, 2022 | 10:21 PM
Share

पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये केस गळणे, केसांत कोंडा होणे (Dandruff) इत्यादी सर्व प्रकारच्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत घराच्या स्वयंपाकघरात मिळणारे मेथीचे दाणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. मेथीचे दाणे केवळ तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाहीत तर तुमच्या केसांसाठीही अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात.

मेथी पावडर (Fenugreek powder) तयार करून केसांमध्ये वापरली जाते. या पावडरमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ते केस गळणे थांबवतेच, पण केसांना सील्की बनवते आणि त्यांच्या वाढीसाठी चांगले पोषण करते.

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात जे केसांची चांगली वाढ आणि टाळूच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. भारतीय आयुर्वेदात केसांना सुंदर बनवण्यासाठी वर्षानुवर्षे याचा वापर (Use it for years) केला जातो. जाणून घेऊया आपण आपले केस निरोगी ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचा कसा वापर करू शकतो.

डोक्यातील कोंडया साठी सर्वोत्तम उपाय

मेथी पावडर केसांतील कोंडयावर उत्तम उपाय मानली जाते. अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध मेथी दाणे केसांमधील कोंडा दूर करते. टाळूवरील फोड आणि मुरुम इत्यादी दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

केसगळतीवर उपचार

मेथी दाणे केस गळतीवर रामबाण उपाय मानला जातो. केसगळतीसाठी कॉर्टिसॉल जबाबदार मानले जाते. मेथीचे दाणे कोर्टिसोल कमी करून केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते.

केस जास्त काळ काळे ठेवण्यास उपयुक्त

तुमचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, केस अकाली पांढरे होण्यापासून रोखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे केस अकाली पांढरे होण्यापासून रोखायचे असतील, तर मेथी दाणे देखील तुमच्यासाठी या बाबतीत उपयुक्त ठरू शकतात. पोटॅशियम युक्त मेथी दाणे केस

पांढरे होण्यास प्रतिबंध करतात.

केसांना सिल्की आणि मजबुत बनवते तुमचे केस खराब झालेले, कोरडे आणि निर्जीव झाले असले तरीही तुम्ही केसांसाठी मेथीचा वापर करावा. मेथी दाणे केसांची चमक वाढवतात. त्यांना सिल्की आणि मजबुत बनवतात.

केसांवर कसे वापरावे मेथीचे दाणे

मेथीचे दाणे वापरण्यासाठी तुम्ही हेअर मास्क बनवून केसांना लावू शकता. यासाठी एक कप मेथी दाणे पाण्यात आठ तास भिजवून ठेवा. मिक्सरमध्ये चांगले बारीक करून त्यात दोन ते तीन चमचे दही मिसळा. यानंतर एलोवेरा जेल मिक्स करून ही पेस्ट केसांना लावा. ही पेस्ट केसांवर सुमारे एक तास ठेवा. यानंतर केस पाण्याने धुवा. हवे असल्यास तेलात मेथीचे दाणे घालून गरम करा. थंड झाल्यावर हे तेल एका बाटलीत भरून ठेवा. या तेलाची केसांना मसाज करूनही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.