AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : पावसाळ्याच्या हंगामात जांभळाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

जांभूळ केवळ जठरासंबंधी समस्या दूर करण्यातच मदत करत नाहीतर जांभूळ आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.

Skin Care Tips : पावसाळ्याच्या हंगामात जांभळाचा 'हा' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 29, 2021 | 7:11 AM
Share

मुंबई : जांभूळ केवळ जठरासंबंधी समस्या दूर करण्यातच मदत करत नाहीतर जांभूळ आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे रक्ताचे शुद्धीकरण आणि त्वचा चमकदार करण्यात मदत करते. पावसाळ्यात आपण त्वचेसाठी जांभूळापासून बनविलेले फेसपॅक वापरू शकता. हे केवळ मुरुम आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करणार नाही तर आपली त्वचा हायड्रेटेड देखील ठेवेल. (jamun face pack beneficial for skin)

कोरड्या त्वचेसाठी – 5-6 जांभूळ घ्या आणि मिक्सरने बारीक करा. 2 चमचा दही, 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस 2 चमचा जांभूळ लगदा रसात मिसळा. ब्रशच्या मदतीने या ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 20-30 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

मुरुमाच्या समस्येसाठी – जांभूळाच्या बियाणाची पूड 1 चमचे घ्या आणि 1 चमचे कच्च्या दुधात 1 चमचे टोमॅटोचा रस मिसळा. हे सर्व मिसळा आणि पेस्ट मुरूमावर लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच ठेवा आणि सकाली थंड पाण्याने चेहरा धुवा.

तेलकट त्वचेसाठी – 5-6 जांभूळ घ्या आणि जांभूळचा लगद्याची बारीक पेस्ट तयार करा. यामध्ये बेसन पीठ मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

मुरुमांवर लाभदायी :

जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुम बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(jamun face pack beneficial for skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली