AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस

बटाटा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो. बटाटा रस चेहऱ्यावरील काळे डाग व त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करतो.  (know is how to use potato juice to remove dark spots on the skin)

त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस
त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 7:03 AM
Share

मुंबई : आजच्या घडीला महिला सौंदर्याची विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. आपला चेहरा अधिक ताजातवाना आणि त्वचा अधिक चमकदार कशी राहील, याकडे महिला विशेष लक्ष देतात. त्याच अनुषंगाने महिला चेहऱ्याची अर्थात आपल्या सौंदर्याची काळजी घेतात. अशावेळी घरगुती उपाय महिलांना अधिक सोईस्कर ठरतात. चेहऱ्यावर मुरुम उठणे ही अनेक महिलांसाठी डोकेदुखी असते. मुरुमाच्या समस्येवर मात कशी करायची हे अनेक महिलांपुढील मोठे कोडे असते. मुरुमामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी महिलांना स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या अनेक वस्तूंचा उपयोग गुणकारी ठरू शकतो. (know is how to use potato juice to remove dark spots on the skin)

हळदीपासून ते टोमॅटोपर्यंतच्या भाज्यांपर्यंत विविध वस्तूंचा त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. अशाच प्रकारे बटाट्याचा रसही आपल्या त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी वापरात येऊ शकतो. बटाटा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो. बटाटा रस चेहऱ्यावरील काळे डाग व त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करतो.

बटाट्याचा आणि लिंबूचा रस

लिंबूच्या रसमध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. त्वचेसाठी लाभदायी असलेल्या सर्वात चांगल्या जीवनसत्वांमध्ये क जीवनसत्व महत्त्वाचे आहे. तुम्ही बटाट्याचा आणि लिंबूचा रस समान प्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण करू शकता. हे मिश्रण कापडाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. जवळपास पाच मिनिटे तुम्ही हे मिश्रण कापडाच्या सहाय्याने ठेवून द्या. नंतर चेहरा पाण्याचे स्वच्छ धुवा. तुम्ही आठवड्यातून तीन वेळा अशाप्रकारे प्रयोग करा.

बटाट्याच्या रसाचा फेस पॅक

तुम्ही बटाट्याच्या रसापासून फेस पॅक तयार करू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही मुल्तानी माती आणि बटाट्याच्या रसापासून मिश्रण तयार करू शकता. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही वेळ हे मिश्रण चेहऱ्यावर सुकायला ठेवा. पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन वेळा या फेस पॅकचा वापर करा.

याव्यतिरिक्त तुम्ही एक चिमूटभर हळद आणि बटाट्याचा रस घेऊन त्याचे मिश्रण बनवू शकता. हे मिश्रणदेखील तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा रस काही मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा. तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

बटाट्याच्या रसपासून टोनर

तुम्ही बटाट्याच्या रसपासून टोनर बनवू शकता. याकरीता एक लहान आकाराचा बटाटा घेऊन त्याचा रस बनवा. त्यात एक कपभर पाणी घाला. या दोन्हींच्या मिश्रणाचा तुमच्या त्वचेवर वापर करा. तुम्ही हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करू शकता. नंतर कॉटन पॅडच्या साहाय्याने हे मिश्रण चेहऱ्यावर वापरू शकता. मात्र हे मिश्रण जास्त दिवसांसाठी स्टोअर करू नका. चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच त्वचेसंबंधी विविध व्याधी दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा ताजा रस वापराल, तेवढे ते आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असेल. (know is how to use potato juice to remove dark spots on the skin)

इतर बातम्या

गुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या

मराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.