Coconut Oil Side Effects | नारळाच्या तेलाचा जास्त वापर करणे त्वचेसाठी हानिकारक! जाणून घ्या दुष्परिणाम

नारळाचे तेल वापरणे फायदेशीर आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर करणे हानिकारक ठरूव शकते. चेहर्‍यावर अधिक प्रमाणात नारळ तेल वापरल्यास त्वचेचा त्रास होऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया नारळ तेलामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल...

Coconut Oil Side Effects | नारळाच्या तेलाचा जास्त वापर करणे त्वचेसाठी हानिकारक! जाणून घ्या दुष्परिणाम
नारळ तेल

मुंबई : बहुतेक लोक केस आणि त्वचेसाठी नारळ तेलाचा वापर करतात. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण नारळ तेल वापरू शकता. हे तेल आपल्या त्वचेची काळजी घेते आणि आवश्यक पोषण देऊन, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुव्यस्थित राखण्यास मदत करते. नारळाच्या तेलाचा प्रभाव गरम असतो, म्हणून हिवाळ्याच्या काळामध्ये हे तेल वापरणे खूप फायदेशीर ठरते. काहीजण त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आंघोळ नंतर हात, पाय आणि चेहऱ्यावर याचा वापर करतात. बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नारळ तेल लावतात (Know the side effects of coconut oil on skin).

उन्हाळ्यात नारळाचे तेल लावणे फायदेशीर आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर करणे हानिकारक ठरूव शकते. चेहर्‍यावर अधिक प्रमाणात नारळ तेल वापरल्यास त्वचेचा त्रास होऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया नारळ तेलामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल…

चेहऱ्यावरील केसांची समस्या

बहुतेक लोकांना हे माहित आहे की, नारळ तेल केसांना मजबूत करून ते वाढवण्यात मदत करते. परंतु आपणास हे माहित आहे का की, नारळ तेल लावल्याने चेहर्‍यावरील केस देखील वाढू शकतात. रात्री झोपेच्या आधी जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील केसांच्या वाढीची समस्या उद्भवू शकते. तसेच, त्वचा तेलकट देखील दिसते. यामुळे त्वचेच्या समस्या अधिक वाढू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेल वापरल्यास सकाळी उठून पहिला आपला चेहरा धुवा. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल्सची समस्या वाढते.

चेहरा लाल होऊ शकतो

नारळ तेलाचा प्रभाव गरम आहे. म्हणून हे तेल हिवाळ्यामध्ये वापरण्याचा सल्ला दिला जातो. अति उष्णतेमुळे आपल्याला त्वचेला संसर्ग होत असल्यास, ते वापरणे टाळा. शुद्ध नारळ तेल किंवा इतर नारळ तेल गरम आहे, त्यामुळे याने मालिश केल्याने चेहरा लाल होईल. याशिवाय इतरही समस्या उद्भवू शकतात.

मुरुमांची समस्या वाढते

नारळ तेल प्रभावाने गरम आहे. ते केसांसाठी चांगले असले तरीही… परंतु, त्याचा अत्यधिक उपयोग त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. यामुळे मुरुमांची समस्या वाढते.

(Know the side effects of coconut oil on skin)

हेही वाचा :

Skin Care : बदाम तेल आणि नारळ तेल त्वचेसाठी गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

Skin Care : तुमची त्वचा तेलकट आहे? मग, ‘हे’ फेसपॅक नक्कीच वापरा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI