Skin Care : ‘हे’ मॉइश्चरायझर घरी तयार करा आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करा!

कोरड्या त्वचेच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. हिवाळ्यात कोरडी त्वचा होणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि अन हेल्दी खाण्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या वाढली आहे.

Skin Care : 'हे' मॉइश्चरायझर घरी तयार करा आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 10:11 AM

मुंबई : कोरड्या त्वचेच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. हिवाळ्यात कोरडी त्वचा होणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि अन हेल्दी खाण्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या वाढली आहे. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण अनेक क्रीम वगैरे वापरतो. परंतू तरीही कोरड्या त्वचेची समस्या दूर होत नाही. अशावेळी आपण घरच्या-घरी मॉइश्चरायझर तयार करून त्वचेला लावले तर आपल्या त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास नक्की मदत होईल. (Make a moisturizer at home and eliminate the problem of dry skin)

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी घरी मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी चार चमचे ताज्या कोरफडीचा गर, दुधावरची साय आणि गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम कोरफडीच्या गरची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये गुलाब पाणी आणि दुधावरची साय मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण त्वचेला लावा. ही पेस्ट आपण दररोज ताजी तयार करून त्वचेला लावली पाहिजे. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. ही पेस्ट आपण कोणत्याही हंगामात त्वचेला लावू शकतो.

कोरडी त्वचा दूर करण्यासाठी खोबरेल तेलात बेसन पीठ मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण दिवसातून एकदा तरी लावला पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. मात्र, हा फेसपॅक लावताना पेस्ट नेहमीच ताजी असावी. पेस्ट एकदाच तयार करून ठेऊ नका. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्याला दुसरे काहीही लावू नका.

हळद आणि बेसन पीठाचे मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी, एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हे मॉइश्चरायझर कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता. केळी आणि खोबरेल तेलाचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील आणि त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि संपूर्ण त्वचेला लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

(Make a moisturizer at home and eliminate the problem of dry skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.