Pineapple Face Masks : ‘या’ सोप्या नैसर्गिक घरगुती उपायांनी चमकदार त्वचा मिळवा!

अननस हे असे एक फळ आहे. जे तुमच्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अननसामुळे आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होते. त्यात असलेले व्हिटॅमिन बी आणि सी आपल्याला कोरड्या आणि निर्जीव त्वचेचा सामना करण्यास मदत करू शकतात.

Pineapple Face Masks : 'या' सोप्या नैसर्गिक घरगुती उपायांनी चमकदार त्वचा मिळवा!
अननस
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 2:02 PM

मुंबई : अननस हे असे एक फळ आहे. जे तुमच्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अननसामुळे आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होते. त्यात असलेले व्हिटॅमिन बी आणि सी आपल्याला कोरड्या आणि निर्जीव त्वचेचा सामना करण्यास मदत करू शकतात. हे कोलेजनचे उत्पादन देखील वाढवते. अननसामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते. त्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मुरुम आणि त्वचेवरील पुरळ काढून टाकण्यास मदत करतात. (Pineapple Face Masks Beneficial for the face)

दूध आणि अननस फेस मास्क – दूध एक नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे. जे ओलावा आकर्षित करते. अननसात दुध मिसळून हायड्रेटिंग फेस मास्क बनवता येतो. कोरड्या त्वचेसाठी हा पॅक फायदेशीर आहे. हे बनवण्यासाठी आधी अर्धा अननस घ्या आणि मॅश करा. त्यात 2-3 चमचे दूध घाला. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास सोडा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.

बेसन पीठ आणि अननस फेस मास्क – बेसन पिठात चमकदार त्वचा आणि हलके डाग दूर करण्याचे गुणधर्म आहेत. अननस त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते. हा मास्क तुम्हाला डार्क स्पॉट्स, पुरळ, बारीक रेषा आणि मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. हा मास्क बनवण्यासाठी आधी दोन चमचे अननसाचा लगदा दोन चमचे बेसन, काही थेंब गुलाबपाणी मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा, कोरडे होऊ द्या. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

पपई आणि अननस फेस मास्क – अननस आणि पपई दोन्ही व्हिटॅमिन सी समृद्ध आहेत. पपई एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जो त्वचेचा टोन हलका करतो. अननस मृत त्वचा ओलावा आणि काढून टाकण्यासाठी ओळखला जातो. हे पॅक बनवण्यासाठी, 4 चमचे मॅश केलेले अननस घ्या आणि त्यात 3 चमचे पपईचा लगदा घाला. पेस्ट मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करा. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हा मास्क वापरा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Pineapple Face Masks Beneficial for the face)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.