उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेत. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
तांदळाचे पीठ

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा तेलकट, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या. उन्हाळ्याच्या हंगामात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Rice flour is extremely beneficial for the skin)

-तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

-तांदळाचे पीठ टॅनिंग काढून टाकून आपल्याला नैसर्गिक चमक देते. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये एक चमचा कच्चे दूध आणि कोरफड जेल घालावे आणि हलके हातांनी चेहरा व्यवस्थित स्क्रब करावा आणि उर्वरित फेस पॅक 10 मिनिटांसाठी संपूर्ण चेहऱ्यावर लावावा. यानंतर आपला चेहरा खूप चमकेल

-तांदळाचे पीठ आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.

-दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा बटाट्याची पेस्ट, एक चमचा ऑलिव्ह ऑइल सर्व सामग्री एकत्रित करून स्क्रब तयार करा. ही पेस्ट मान व चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या स्क्रबच्या वापरामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.

संबंधित बातम्या : 

(Rice flour is extremely beneficial for the skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI