Rose : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये ‘हा’ खास घटक मिक्स करा, वाचा अधिक! 

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी आपण अनेक क्रीम आणि बाॅडीलोशन या हंगामात त्वचेला लावतो.

Rose : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये 'हा' खास घटक मिक्स करा, वाचा अधिक! 
गुलाब पाकळ्या
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 12:05 PM

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी आपण अनेक क्रीम आणि बाॅडीलोशन या हंगामात त्वचेला लावतो. मात्र, असे करूनही म्हणावा तसा काही खास फरक जाणवत नाही.

खरोखरच आपल्याला कोरड्या त्वचेची समस्या दूर करायची असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी एकदम सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे हिवाळ्याच्या हंगामामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या झटपट कमी होते.

गुलाब पाकळ्यांमध्ये असलेले घटक

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवतात. गुलाबाच्या पाकळ्यातील दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची लालसरपणा आणि जळजळ शांत करतात. गुलाबपाणी त्वचेतील आर्द्रता संतुलित ठेवण्यास मदत करते. हे अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करते. गुलाब पाकळ्यात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेचे वृद्धत्व टाळण्यास मदत करतात.

हिवाळ्याच्या हंगामात आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक वापरा पाहिजे. हा पॅक आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतो. हे त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हे त्वचेवरील कोरड्यापणाची समस्या दूर करण्यास मदत करते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 1 चमचे गुलाब पावडर आणि 1 चमचे मध आवश्यक आहे. हे दोन्ही चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. 10 ते 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

हे देखील महत्वाचे

गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Rose petals are beneficial for relieving dry skin problems)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.