Smudge Proof Kajal: काजळ लावताना वापरा या टिप्स, खराब होणार नाही तुमचा लुक !

काजळ हे सर्व मुलींचे आवडते मेकअप प्रॉडक्ट आहे. मुलींना काजळ रोज लावायला आवडतं. मात्र, काही तासांनंतर काजळ पसरल्यामुळे त्रास होऊ शकतो. हा त्रास वाचवण्यासाठी काजळ लावताना काही टिप्सचा वापर करावा.

Smudge Proof Kajal: काजळ लावताना वापरा या टिप्स, खराब होणार नाही तुमचा लुक !
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 1:18 PM

मुलींना काजळ (kajal) लावणं खूप आवडतं आणि बहुतांश मुलींचं काजळ हे सर्वात पहिलं मेकअप प्रॉडक्ट (makeup product) असतं. चेहऱ्यावर काही मेकअप केला नाही, केवळ डोळ्यांना काजळ लावलं तरी तुम्हाला एक फ्रेश आणि सुंदर लूक मिळू शकतो. साधारणत: काजळाचा वापर बहुतांश मुली शाळेत, कॉलेज किंवा ऑफीसला जाताना दररोज करतात. काजळ लावल्यावर डोळे खूप सुंदर दिसतात हे खरं असलं तरी एक त्रासही सहन करावा लागतो. तो म्हणजे काजळ पसरणे अर्थात स्मज (smudge proof Kajal) होण्याचा. बऱ्याच मुली शाळा, कॉलेज किंवा कामासाठी तासनतास बाहेर असतात. ऊन आणि हवेमुळे डोळ्यांतून पाणी येऊ शकतो, घाम येतो, त्यामुळे डोळ्यातील काजळ पसरतं. आणि आधी सुंदर दिसणाऱ्या डोळ्यांचा लूक हळूहळू बिघडतो. हे काजळ पसरू नये, ते स्मज प्रूफ रहावे, यासाठी काजळ लावताना काही सोप्या टिप्सचा (tips to apply kajal) वापर करता येऊ शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

स्मज प्रूफ काजळ लावण्यासाठी फॉलो करा या टिप्स –

काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांची करा तयारी –

काजळ लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून नीट कोरडा करा. त्यानंतर एखादा स्वच्छ टॉवेल किंवा कापूस घ्यावा आणि डोळे व आजूबाजूचा भाग नीट कोरडा करावा. पाण्यामुळे डोळ्यांमध्ये व आजूबाजूला ओलावा निर्माण होतो, तो भीग नीट पुसावा. त्यानंतर काजळ लावल्यास मॅट फिनिश लूक मिळतो आणि काजळ कमी पसरतं.

लोअर लॅश लाइनवर काजळ लावावे –

बऱ्याचदा मुली काजळ हे वॉटर लाइनवर लावतात, ज्यामुळे काजळ पसरण्याची शक्यता जास्त असते. काजळ पसरू द्यायचे नसेल तर वॉटर लाइन ऐवजी ते आपल्या लॅश लाइनवर म्हणजे जिथे आपल्या पापण्या असतात, तिथे काजळ लावावे.

आयलायनर किंवा आयशॅडोचा करा वापर –

लोअर लॅशवर काजळ लावल्यानंतर काजळावरती आय लायनरची एक पातळ रेष ओढावी. किंवा तुम्ही ब्लॅक आयशॅडोचाही तुम्ही वापर करू शकता. असे केल्याने काजळ पसरणार नाही आणि मॅट व सुंदर लूक मिळेल.

डोळ्यांखाली घाम येऊ देऊ नका –

काजळ पसरण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण असते डोळ्यांतील ओलावा आणि येणारा घाम. त्यामुळे जेव्हा तुम्ही काजळ लावून बाहेर जाल, तेव्हा डोळ्यांखालील भाग एखाद्या कॉटनच्या कापडाने टिपत रहा, म्हणजे घाम टिपला जाईल. तसेच डोळ्यांना सारखा हात लावू नका. या टिप्स फॉलो केल्यास तुमचे काजळ पसरणार नाही व डोळ्यांचा सुंदर लूक कायम राहील.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.