Skin Care Tips : हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी ‘हे’ फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा! 

मुरुम, एक्जिमा, पिंपल्स इत्यादीसारख्या त्वचेच्या अनेक समस्यांचे कारण प्रदूषण असू शकते. हे देखील त्वचेचे वृद्धत्वाचे कारण आहे. त्याचबरोबर हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते.

Skin Care Tips : हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी 'हे' फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा! 
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 9:59 AM

मुंबई : मुरुम, एक्जिमा, पिंपल्स इत्यादीसारख्या त्वचेच्या (Skin) अनेक समस्यांचे कारण प्रदूषण असू शकते. हे देखील त्वचेचे वृद्धत्वाचे कारण आहे. त्याचबरोबर हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. अशा परिस्थितीत ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही घरगुती फेसपॅक वापरू शकता. कोणकोणत्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही घरगुती फेसपॅक बनवू शकता. हे आपण बघणार आहोत.

कोको बटर आणि ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑईल आणि कोकोआ बटर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात. आल्याची पेस्ट त्वचेतील जास्त घाण काढून टाकण्यास मदत करेल. प्रत्येकी एक चमचा कोको बटर आणि ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट एकत्र मिक्स करा. ते तुमच्या त्वचेवर आणि मानेवर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा.

केळी आणि दूध

दूध आणि केळीचे मिश्रण त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. एका वाडग्यात पूर्ण मॅश केलेले केळे घ्या आणि त्यात एक चमचा दूध घालून चांगले मिसळा. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या आणि काही वेळाने कोमट पाण्याने धुवा.

कोरफड आणि बदामाचे तेल 

बदाम तेल किंवा तिळाचे तेल सुमारे 8-10 थेंब आणि कोरफड जेल एक चमचे घ्या. मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी आपला चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.

पपई आणि कच्चे दूध

पपईमध्ये आवश्यक पोषक आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. दुधात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे कोरड्या आणि निर्जीव त्वचेला आर्द्रता प्रदान करते. यासाठी अर्धी पिकलेली पपईचे तुकडे करून कच्चे दूध घ्या. पपई मॅश करून पेस्ट बनवा. त्यात कच्चे दूध घाला. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या आणि पाण्याने धुवा.

गाजर आणि मध

गाजरात असलेले बीटा-कॅरोटीन निस्तेज आणि कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. मध त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हा पॅक मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास देखील मदत करेल. यासाठी सोललेली आणि किसलेले गाजर घ्या. एक चमचा मध घ्या आणि ते चांगले मिसळा. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.