AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : निरोगी त्वचेसाठी मसूर डाळीचे ‘हे’ फेसपॅक वापरा!

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळीचे फेसपॅक खूप फायदेशीर आहेत.

Skin Care : निरोगी त्वचेसाठी मसूर डाळीचे 'हे' फेसपॅक वापरा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 10:15 AM
Share

मुंबई : बहुतांश लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मसूर डाळ खायला आवडते. मसूर पौष्टिकतेने समृद्ध आहे, म्हणून हे निरोगी अन्न मानले जाते. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळीचे फेसपॅक खूप फायदेशीर आहेत. मसूर डाळीचे फेसपॅक त्वचेला लावल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. (This face pack of lentils is beneficial for healthy skin)

मसूर डाळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचे कोरफड जेल, लिंबाचा रस आणि मसूर डाळीची बारीक केलेली पेस्ट एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या. त्यानंतर दहा मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवा आणि आपल्या चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.

दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल. मसूर डाळ त्वचेवर एका क्लीन्सरप्रमाणे काम करते. यासह मुरुमांच्या समस्येतूनही मुक्ती मिळते.

मसूर डाळ एक नैसर्गिक एक्सफोलिएटर प्रमाणे कार्य करते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होण्यास देखील मदत होते. मसूर डाळीचा फेस पॅक बनवण्यासाठी आधी या डाळीची पावडर करून ठेवा. डाळीची पूड आणि दुध एकत्र करून त्यांची पेस्ट बनवा. हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. जलद उपायासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक वापरा.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(This face pack of lentils is beneficial for healthy skin)

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…