ओठांवर काळपटपणा आलायं? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा, वाचा!

आपल्या साैदर्यांचे प्रतिक आपले ओठ आहेत. यासाठी ओठ नेहमीच सुंदर, गुलाबी, तजेलदार आणि चमकदार दिसले पाहिजेत.

ओठांवर काळपटपणा आलायं? मग, 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा, वाचा!
ओठ

मुंबई : आपल्या सौंदर्याचे प्रतिक आपले ओठ आहेत. यासाठी ओठ नेहमीच सुंदर, गुलाबी, तजेलदार आणि चमकदार दिसले पाहिजेत. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला चेहऱ्याचीच काळजी घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे ओठांकडेही दुर्लक्ष होते. ओठ्यांवरील काळपटपणा काढण्यासाठी आपण दुधावरची साय, खोबरेल तेल आणि बदाम तेल वापरून शकतो. यासाठी एक चमचा दुधावरची साय, खोबरेल तेल एक चमचा आणि बदाम तेल आपल्यााला लागणार आहे. (tips to make lips beautiful and healthy)

वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर ही पेस्ट आपल्या ओठ्यांवर लावा आणि सकाळी थंड पाण्याने आपले ओठ धुवा. यामुळे ओठ्यांवरील काळपटपणा निघून जाण्यास मदत होते. ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण मध आणि एव्हकाडो मिसळून हायड्रेटिंग लिप मास्क तयार करू शकता. यासाठी, एका भांड्यात एक चमचा मध, 2 चमचे पिकलेले एव्हकाडो मिसळा. मात्र हे मिश्रण आपल्या आठोवर लावा.

हे मिश्रण आपल्या ओठांना जास्त काळ हायड्रेट ठेवेल आणि ओठांची त्वचा फुटणार नाही. ओठांच्या समस्या दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो. जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा.

आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. डाळिंब आणि साय यांचा लीप मास्क बनवण्यासाठी एका वाटीत प्रथम डाळिंबाचा रस घ्या आणि त्यात दुधाची ताजी साय आणि व्हिटामिन ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने कोमट पाण्याने ओठ स्वच्छ धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(tips to make lips beautiful and healthy)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI