चेहऱ्यावरील ग्लो हरवलाय? चंदनापासून तयार फेसपॅक ठरेल परिणामकारक, काळे डागही जातील

चमकदार व नितळ त्वचेसाठी फार आधीपासून चंदनाच्या लेपाचा वापर केला जात आहे. चंदनामुळे मुरुम आणि बॅक्टेरियामुळे चेहऱ्यावरील काळे डाग मुळापासून नष्ट होण्यास मदत होते. याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील चमक परत आणण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील ग्लो हरवलाय? चंदनापासून तयार फेसपॅक ठरेल परिणामकारक, काळे डागही जातील
Sandalwood Face Mask
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:27 PM

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या युगात प्रदूषण, फास्ट फूड आदींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. चेहऱ्यावरील चमक जावून तो काळवंडतो. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये चंदनाचा (Sandalwood) मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. परंतु बाजारातील कृत्रिम प्रोडक्ट (Artificial Product) वापरतानाही मनात धाकधूक निर्माण असते. अशा वेळी चेहऱ्यावरील चमक (glowing skin) पुन्हा मिळवण्यासाठी महिलांकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. बाहेरील प्रोडक्ट न वापरताही घरगुती पध्दतीने चंदनापासून लेप तयार करुन आपल्या चेहऱ्यावरील चमक पुन्हा निर्माण करता येउ शकते. चंदनामध्ये जंतुनाशक आणि उष्णताविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

फेसपॅकसाठी चंदनाचा उत्तम वापर होतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आयुर्वेदिक पध्दतीने त्वचेवरील चमक मिळवण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. चंदनामध्ये असलेले नैसर्गिक तेल सूर्यापासून निघत असलेल्या तीव्र किरणांवर त्वचेवरील प्रभाव कमी करण्यास मदत करते. चंदन हे त्वचेच्या छिद्रांमधून धूळ आणि मृत पेशी काढून टाकते. चंदनामध्ये देखील अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हे मुरुम आणि बॅक्टेरियामुळे होणारी इतर आजारांना नष्ट करते. उन्हाळ्यात याचा लेप लावल्यास त्वचेची आग नष्ट होते. त्यामुळे अनेक तज्ज्ञदेखील चंदनाचा लेप लावण्याचा सल्ला देत असतात. याच्या नियमित वापरामुळे शरीरातील उष्णता नियंत्रणात राहण्यासही मदत होत असते.

असा बनवा चंदनाचा ‘फेसपॅक’

चंदन आणि गुलाबपाण्यापासून अगदी सहज हा फेसपॅक तयार होतो.

  • गुलाबपाणी आणि चंदन पावडर यांचे मिश्रण तयार करावे. नंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. तेलकट त्वचेसाठी हा फेसपॅक अतिशय परिणामकारक ठरतो.
  • फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याचा रस देखील वापरू शकता. यासाठी संत्र्याच्या रसात थोडीशी चंदन पावडरही टाकू शकता. ते कोरडे होईपर्यंत चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
  • मुरुम कमी करण्यासाठी चंदन पावडर, हळद आणि लिंबाचा रस घालून फेसपॅक बनवू शकता. यासाठी चंदन पावडर घ्यावी. त्यात हळद आणि लिंबाचा रस घाला हा लेप चेहऱ्यावर लावल्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल.
  • चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर दही, कच्चे दूध आणि चंदन पावडर एकत्र मिसळा. हे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
  • त्वचेला सुरकुत्या पडल्या असतील तर हा फेसपॅक त्यावर परिणामकारक आहे. यासाठी अंड्याचा पांढरा भाग, दही आणि सफरचंदाचा थोडा रस आणि चंदन पावडर घ्या. हे सर्व साहित्य चांगले मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने धुवा, अकाली वृध्दत्वापासून वाचण्यासाठी हा फेसपॅक अतिशय चांगला आहे.

इतर बातम्या

Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!

Winter Care Tips : ओठांची मृत त्वचा काढायची असेल तर हे घरगुती उपाय नक्की करा!

Hair Care Tips : कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हे हेअर मास्क फायदेशीर!

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.