AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Face Pack : हळदीचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

सुंदर आणि स्वच्छ त्वचेसाठी अनेक प्रकारची महागडी उत्पादने वापरली जातात. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकतो. हळदीचा वापर करून तुम्ही अनेक फेसपॅक तयार करू शकता. मुरुमापासून ते कोरडी त्वचा, निस्तेज त्वचा आणि वृद्धत्व विरोधी, हळद प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.

Face Pack : हळदीचे 'हे' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
त्वचा
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 8:25 AM
Share

मुंबई : सुंदर आणि स्वच्छ त्वचेसाठी अनेक प्रकारची महागडी उत्पादने वापरली जातात. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकतो. हळदीचा वापर करून तुम्ही अनेक फेसपॅक तयार करू शकता. मुरुमापासून ते कोरडी त्वचा, निस्तेज त्वचा आणि वृद्धत्व विरोधी, हळद प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर कसा करू शकता ते जाणून घेऊया.

हळद आणि लिंबू फेसपॅक

एक चिमूटभर हळद आणि 2 चमचे ताज्या लिंबाचा रस घ्या. मिक्स करून पेस्ट बनवा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15-20 मिनिटे सोडा. पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हळद आणि लिंबाचा हा फेसपॅक चेहऱ्याला लावा.

हळद आणि पपई फेसपॅक

पपईचा लगदा बनवण्यासाठी एक कप पपईचे चौकोनी तुकडे घ्या आणि ते ब्लेंड करा. ते बाहेर काढा आणि त्यात एक चिमूटभर हळद घाला. एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे त्वचेवर सोडा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा लावू शकता.

हळद आणि कोरफड फेसपॅक

एक चमचा हळद घ्या आणि त्यात कोरफड जेल मिक्स करा. एकत्र मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे सोडा. आठवड्यातून 2-3 वेळा हळद आणि कोरफडचा हा खास पॅक आपल्या चेहऱ्याला लावा.

हळद आणि दही फेसपॅक

एक चिमूटभर हळद पावडरमध्ये 1-2 चमचे दही मिसळा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर देखील लावा. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा आणि 15-20 मिनिटे सोडा. यानंतर साध्या पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेवर नैसर्गिकरित्या उपचार करण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा हळद आणि दही फेसपॅक वापरा.

हळद आणि मध फेसपॅक

चिमूटभर हळद घ्या आणि त्यात थोडा मध घाला. एकत्र मिसळून पेस्ट बनवा. हे सर्व चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20-30 मिनिटे सोडा. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा फेसपॅक पुन्हा आपल्या चेहऱ्याला लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Turmeric face pack is extremely beneficial for the skin)

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...