चमकदार त्वचेसाठी वापरा झेंडूची फुले वापर करा; जाणून घ्या याचे फायदे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 7:35 AM

त्वचेच्या आरोग्यासाठी तर या फुलाचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. सुंदर त्वचेसाठी या फुलाचा अवश्य वापर करू शकता.

चमकदार त्वचेसाठी वापरा झेंडूची फुले वापर करा; जाणून घ्या याचे फायदे
चमकदार त्वचेसाठी वापरा झेंडूची फुलांचा करा वापर

Follow us on

मुंबई : कुठलाही सण, उत्सव असो, तिथे हमखास झेंडूच्या फुलांचा वापर होतो. हे झेंडूचे फूल आपल्या घरातही लागवड केले जाऊ शकते. याचा वापर घराच्या सजावटसाठी केला जातो. प्रत्येक घरामध्ये समारंभामध्ये याच फुलांचा वापर करून आकर्षक सजावट केली जाते. ज्या प्रमाणात हे फुल सजावटीसाठी वापरले जाते, त्याच प्रमाणात या फुलाचा आपल्या उत्तम आरोग्यासाठी केला जाऊ शकतो. हे फुल अनेक व्याधींवर उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. त्वचेच्या आरोग्यासाठी तर या फुलाचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. सुंदर त्वचेसाठी या फुलाचा अवश्य वापर करू शकता. या फुलामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण आहेत. हेच गुण आपल्या सुंदर त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. (Use marigold flowers for glowing skin; Learn the benefits)

नॅचरल टोनर

आपण झेंडूच्या फुलांचा वापर नॅचरल टोनर म्हणून करू शकता. झेंडूची फुले गरम पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर त्याच पाण्याने आपला चेहरा धुवा. हा नैसर्गिक टोनर तुमची त्वचा संरक्षित करण्यास मोठी मदत करेल. फुलांचे हे पाणी त्वचेला ग्लोइंग लुक देईल. हा टोनर त्वचेच्या डेड सेल्स हटवण्यासाठी मदत करतो. तुम्ही हवे असेल, तर या फुलांचे पाणी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. हे पाणी त्वचेवर लावल्यामुळे आपली त्वचा अगदी फ्रेश वाटू लागते.

फेस मास्क

तुम्ही झेंडूच्या फुलांचा फेस मास्क म्हणून वापर करू शकता. हा मास्क बनवण्यासाठी झेंडूचे फूल चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. फुलांची पावडर बनवा. या पेस्टमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवून घ्या. तुम्ही ही पेस्ट बाटलीमध्ये ठेवू शकता. तुम्हाला या पेस्टचा 4 ते 5 दिवसांमध्ये कधीही वापर करता येईल. या मिश्रणाचा वापर तुम्ही आठवड्यातून 2 दिवस करू शकता.

चेहरा साफ करा

आपला चेहरा साफ करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करा. झेंडूची फुले पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्या. त्याचा तुमच्या चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुम्ही ही फुले साधारण 5 मिनिटे पाण्यामध्ये उकळू शकता. जेव्हा हे गरम पाणी थंड होईल, त्यावेळी पाण्यातील फुलांचा भाग बाजूला करून ते पाणी प्या. शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर काढण्यास हे पाणी उत्तम काम करते. (Use marigold flowers for glowing skin; Learn the benefits)

इतर बातम्या

केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात पनवेलमध्ये निदर्शने, रस्त्यातच चुलीवर बनविले जेवण

शेलार म्हणाले राज्य सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी केलं, आता जयंत पाटलांचा पलवटवार, म्हणाले…

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI