Benefits of amla : या 5 कारणांसाठी हिवाळ्यात करा आवळ्याचे सेवन

Benefits of amla in marathi : आवळ्यापासून वेगवेगळे प्रकार करुन तो आहारात समाविष्ट केला जातो, हिवाळ्यात आवळा निरोगी ठेवण्यास मदत करते. आवळा खाण्याचे 5 मोठे फायदे आहेत. आवळ्यात भरपूर पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत सर्वच गोष्टींचा फायदा होतो.

Benefits of amla : या 5 कारणांसाठी हिवाळ्यात करा आवळ्याचे सेवन
amla
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 4:57 PM

Benefits of amla : थंडी सुरु झाली की हवामानातील बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. प्रतिकारशक्ती कमकुवत असली की व्यक्ती आजारी पडतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी चांगला आहार घ्यावा लागतो. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. यामुळेच लोक हिवाळ्यात आहारात काही बदल करतात. निरोगी राहण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

आवळ्याचं सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आवळ्याचे अनेक आरोग्य फायदे मिळतात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेले हे फळ आरोग्यासाठी खूपच चांगले आहे. आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही ते फायदेशीर आहे. चला मग आपल्या आहारात याचा समावेश करण्याचे फायदे जाणून घेऊया.

हृदय निरोगी

आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे तणाव कमी करून हृदयाच्या आरोग्य चांगले ठेवतात. आवळा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

प्रतिकारशक्ती वाढवणे

आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते, जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते.

केसांसाठी फायदेशीर

आरोग्यासोबतच आवळा आपल्या केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. काळे, लांब आणि दाट केस हवे असतील तर तुम्ही ते तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश केला पाहिजे.

त्वचा निरोगी ठेवते

आरोग्य आणि केसांव्यतिरिक्त आवळा आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते, त्वचेची लवचिकता वाढवते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. याशिवाय आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. त्यात असलेले पॉलीफेनॉल इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि ग्लुकोज चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी संभाव्यतः फायदेशीर ठरते.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.