चेहऱ्यावर बीटरूट पेस्ट लावण्याचे फायदे, कसा तयार कराल फेसपॅक?
चेहऱ्यावर बीटरूट पेस्ट लावण्याचे अनेक फायदे आहेत. पण अनेकांना बीटरूट फेसपॅक कसा तयार करायचा हे माहिती नाही... त्यामुळे जाणून घ्या बीटरूट फेसपॅक तयार करण्याची सोपी पद्धत

प्रत्येक महिलेला मेकअपचं प्रडंच वेड असतं. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक सौंदर्य प्रसाधणांचा देखील वापर करतता. पण त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम दिसून येतात एवढंच नाही तर, बाजारात अनेक प्रॉडक्ट्सच्या क्रिम, फेसपॅक आणि इत्यादी गोष्टी सहज मिळतात. पण तुम्हाला बाहेरचे महागडे प्रॉडक्ट खरेदी न करता घरातल्या घरात उत्तम फेसपॅक तयार करता येऊ शकतो… बीटरूट तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, तर बीटरूट फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार दिसेल.. त्याचा बीटरूटचं फेसपॅक कसं तयार करतात जाणून घ्या…
जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येत बीटरूटचा समावेश केला पाहिजे. बीटरूट तुमच्या त्वचेचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते. तर जाणून घ्या बीटरूट फेस पॅक बनवण्याची एक अतिशय सोपी रेसिपी.
फेस पॅक बनवण्यासाठी, प्रथम बीट स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि नंतर ते बारीक करा. आता, एका भांड्यात बीटची पेस्ट, थोडे मध आणि थोडे दही घाला. हे सर्व रसायनमुक्त घटक नीट मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. बीट, मध आणि दह्याचा हा फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सर्वोत्तम परिणामांसाठी, कोमट पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे पॅक तसाच राहू द्या. धुतल्यानंतर, तुम्ही मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरु नका…
पार्लरमध्ये न जाता नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळविण्यासाठी बीटरूट फेस पॅकचा वापर करता येतो. तुमच्या चेहऱ्यावर डाग असले तरीही, तुम्ही बीटरूट, मध आणि दह्यापासून बनवलेला हा औषधी फेस पॅक वापरू शकता. बीटरूट फेस पॅकमधील असंख्य पोषक घटक तुमची त्वचा चमकदार बनवण्यास प्रभावी ठरू शकतात. मात्र, हा फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करायला विसरू नका.
काय आहे बीटरूटचे फायदे
आरोग्यास बीटरूटचे फायदे अनेक आहेत. बीटरूटमधील नायट्रेट्समुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. बीटरूटमध्ये असलेले फायबर पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे नियमित सेवनाने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील बीटरुट फायदेशीर आहे.
