AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : कोसळल्यानंतर अजितदादांच्या विमानाचे स्फोट कमी झाले पाहिजे होते, असं रोहित पवार का म्हणाले?

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : "अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. 27 तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी 6.50 ते 7.05 मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो"

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : कोसळल्यानंतर अजितदादांच्या विमानाचे स्फोट कमी झाले पाहिजे होते, असं रोहित पवार का म्हणाले?
Plane Crash
| Updated on: Feb 18, 2026 | 2:17 PM
Share

“पत्रकार परिषद झाल्यानंतर तपास यंत्रणा काम करत आहेत. त्यांच्यावर आक्षेप नाही. पण त्यांच्या स्पीडवर मात्र आक्षेप आहे. पण प्रेस कॉन्फरन्स झाल्यामुळे तपासाला गती आली आहे. दिल्लीची पीसी झाल्यानंतर डीजीसीएची माणसं खासगी विमानाने बारामतीला गेली होती. आता नेते सुद्धा पत्रकं द्यायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याला लवकरात लवकर उत्तर मिळतील अशी अपेक्षा आहे” असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आज तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन देऊन पत्रकार परिषद घेत आहेत.

“अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. 27 तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी 6.50 ते 7.05 मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो” असं रोहित पवार म्हणाले. “व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत, मेन्टेन्सच्या बाबतीत दाखले दिले होते. बरेच तज्ञ त्या विषयात बोलताना दिसतात. आता जो व्हिडिओ आला त्यात पाहिलं की अधिकचे स्फोट झाले. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, व्हॉइस रेकॉर्डर नाही अशी कारणं पुढे येऊ शकतात. कालच त्या बाबत सरकारच्या एजन्सीकडून स्पष्टीकरण आलं आहे”

तो रनवे डांबरी होता

“विमानात फ्यूल टँक अधिकचे होते. टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतो. तिथेच मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्समध्ये कधी अडचण असू शकते. 2023 ला जे विमान पडलेलं ते मोठं होतं. ते रनवे वर पडलेलं. तो डांबरी रनवे होता, कडक होता, दादांच जे विमान कोसळलं ते साईडला पडलं. म्हणजे बॉल तुम्ही फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो, मातीत तोच वेग कमी असतो. म्हणजे स्फोट कमी होणं अपेक्षित होतं” या महत्वाच्या मुद्याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...