AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित दादांचं विमान बारामतीतच का कोसळलं? रोहित पवारांनी व्हिजीबिलीटीसह लँडिंगचं गणित सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी इंधन, व्हिजीबिलीटी आणि फ्लाईट प्लॅनबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा.

अजित दादांचं विमान बारामतीतच का कोसळलं? रोहित पवारांनी व्हिजीबिलीटीसह लँडिंगचं गणित सांगितलं
rohit pawar ajit pawar
| Updated on: Feb 18, 2026 | 11:04 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत एका विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांच्या जवळचे लोक अजूनही सावरलेले नाहीत. त्यातच आता अजित पवारांचा पुतण्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघातप्रकरणी भाष्य केले आहे.

रोहित पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांचा विमान अपघाताप्रकरणी विविध खुलासे केले आहे. यावेळी त्यांनी फ्यूल टँक, विमानाचे लँडिंग आणि व्हिजीबिलीटी यावर सविस्तर प्रेझेन्टेंशन सादर केले.

रोहित पवार काय म्हणाले? 

पहिले कॅन पेटले नंतर विमानातील पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मुंबईवरुन हे विमान जात असताना ते पूर्ण विमान फ्यूलने भरले होते. ते फुल कशाला भरायचे, तुम्ही इथून उडत असताना जर तुम्ही लगेचच बारामतीवरुन हैदराबादला जाणार होता. तर तुम्ही तिथे जाऊन फ्यूल भरु शकला असता. काही लोक म्हणतील की महाराष्ट्रात स्वस्त फ्यूल आहे. तसंच सुरतमधील फ्यूल जास्त स्वस्त आहे. पण त्यात ३५०० फ्यूल जर बसत असेल तर त्याला ३० ते ३५ हजाराचा फरक पडतो. एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचे कारण काय, त्यामुळे मुद्दाम पायलटचा वापर करुन घातपात झाला असावा, त्या घातपातामध्ये मोठा स्फोट होईल, असा प्लॅन असावा, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

मी जो दाखवतोय तो इमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. पण त्यांनी डीजीसीएला त्यांचा अधिकृत प्लॅन सांगितला नव्हता. ते पुन्हा पुण्याला लँड करु शकत नाही कारण पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नव्हते कारण डिफेन्सचं फ्लाईंग सकाळी होतं. सोलापूर देऊ शकत नाही, त्यातचही अडचणी आहेत. त्यांना दुसरं कोणतं द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त चिपी विमानतळ देऊ शकतात. पण तेही देऊ शकत नाहीत. कारण तिथे धुकं असू शकतं. मग पर्याय म्हणून फक्त मुंबई उरतं… त्यामुळे तुम्ही उगाचच जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन ३००० ची व्हिजीबिलीटी जी ५००० पेक्षा कमी आहे हे डिजीसीएच नॉर्म आहे. त्यामुळे एकतर तुम्ही उडायला नको होतं. जर उडालात तर तिथे लँड करण्याचा प्रयत्न करायला नको होता, असा मोठा खुलासा रोहित पवार यांनी केला.

तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. पण फ्यूल भरलेले होते. आत अधिकचे टँक होते. त्यामुळे परत जाण्यापेक्षा हे विमान खाली आदळण्यात आले. ते मुद्दामून आदळण्यात आले, असं आम्हाला वाटतंय, असाही आरोप रोहित पवार यांनी केला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...