AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झटपट वजन कमी करण्यासाठी तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये ‘हे’ मसाले मिसळा…. जाणून घ्या फायदे

अनेकांची सकाळ ब्लॅक कॉफीने होते. ब्लॅक कॉफीच्या सेवनेमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते त्यासोबतच तुमचं वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. ब्लॅक कॉफीमधील कॅफीन तुमचं वजन कमी करण्यास मदत करतं. चला तर जाणून घेऊया ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?

झटपट वजन कमी करण्यासाठी तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये 'हे' मसाले मिसळा.... जाणून घ्या फायदे
black cofeeeImage Credit source: Pexels
| Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 7:36 PM
Share

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे अनेकांना लठ्ठपणा सारख्या समस्या होत आहेत. तुमच्या शरीरातील लठ्ठपणा वाढल्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाब आणि थायतॉईड सारख्या समस्या होण्याची शक्यता आहे. अनेकजण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक आहाराचा त्यांच्या जीवनशैलीमध्ये समावेश करतात. तर पोषक आहारासोबतच योग्य व्यायाम आणि जीवनशैलीमधील छोटे छोटे बदल तुमच्या वढलेल्या वजन झपाट्याने कमी करू शकतात. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये ब्लॅक कॉफीचा समावेश करू शकता. तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट दरम्यान ब्लॅक कॉफीमध्ये काही विषेश मसाले मिसळल्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी होते. ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असते ज्यामुळे तुमच्या शरीराातील चयापचय सुधारण्यास मदत होईल.

ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्ही जर तुमच्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने केली तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल बदलल दिसून येतात. तुमच्या स्वयंपाककघरातील काही विशेष मसाले तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. या मसाल्यांमधील विशेष घटक तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवते त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित होण्यास मदत होते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये हे मसाले मिसळून त्याचे सेवन करा. या मसाल्यांमध्ये तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असलेले पोषक घटक असतात.

ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्ही जर तुमच्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने केली तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल बदलल दिसून येतात. तुमच्या स्वयंपाककघरातील काही विशेष मसाले तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. या मसाल्यांमधील विशेष घटक तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवते त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित होण्यास मदत होते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये हे मसाले मिसळून त्याचे सेवन करा. या मसाल्यांमध्ये तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असलेले पोषक घटक असतात.

दालचिनी पावडर – सकाळच्या ब्लॅक कॉफीमध्ये दालचिनी मिसळल्यामुळे तुमच्या कॉफीची चव वाढते त्यासोबतच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते. दालचिनीमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते. झटपट वजन कमी करण्यासाठी तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा.

आले – तुमचं वजन भरपूर प्रममाणात कमी करण्यासाठी आले अत्यंत फायदेशीर मानली जाते. हिवाळ्यामध्ये अनेकजण आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात. योग्य प्रमाणात आल्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या पोटासंबंधीत समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये थोडे आले मिसळल्यामुळे तुमच्या शरीराला फायदेशीर ठरते.

हळदी – हळदीमध्ये भरपूर प्रमाणात कर्क्यूमिन असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये हळदी मिसळणं फायदेशीर ठरते. तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये चिमूटभर हळद पावडर मिसळून प्यायल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

काळी मिरी पावडर – वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अत्यंत फायदेशीर ठरते. काळ्या मिरीमध्ये पायपिन असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कॉफीमध्ये काळी मिरी पावडर मिसळून प्या. यामुळे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होतील.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.