AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of Moringa Leaves: शेवगाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे एकून व्हाल थक्क…!

Moringa Leaves Benefits: शेवगाच्या पानांचे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शेवगाच्या पानांमधील पोषक तत्वं तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. शेवगाच्या पानांमधील फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स तुमच्या शरीराला पोषक देतात. चला तर जाणून घेऊया शेवगाच्या पानांचे फायदे.

Benefits of Moringa Leaves: शेवगाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे एकून व्हाल थक्क...!
| Edited By: | Updated on: Feb 03, 2025 | 1:37 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश करणे फायदेशीर असते. तज्ञांच्या मते शेवग्याच्या पानांचे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. अनेकजण सकाळ सकाळी उपाशी पोटी शेनग्याच्या पानांचा चहा पिण्यास पसंती देतात. आयुर्वेदानुसार, शेवगांच्या पानांमध्ये भरपूर औषधी तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. शेवगांच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते. सकाळी उपाशी पोटी शेवग्याची पाने खाल्ल्यामुळे तुमचं शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत होते.

शेवग्यांच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स ए, विटॅमिन्स सी, विटॅमिन्स ई, बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबर असते. त्यामुळे शेवग्याच्या पानांचं नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच शेवगाच्या पानांमधील अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील मुक्तरॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते, तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते आणि तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ देत नाही.

शेवगाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यासोबतच तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. शेवगाच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या पानांमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते आणि शरीरातील टाईप – २ मधुमेह देखील दूर होण्यास मदत करते. शेवगाच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्स तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

त्यासोबतच हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. शेवगाच्या शेंचा तुमच्या उच्च रक्तदाबाच्या समस्या दूर करण्यास मदत करते त्यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शेवगाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहाण्यास मदत होते त्यासोबतच पिंपल्स आणि मुरूम सारख्या सममस्या दूर होतात.

शेवगाच्या पानांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटी सारख्या समस्या होत नाही. शेवगाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते आणि वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. शेवगाच्या पानांचा तुमच्या आरोग्याला फायदे तर होतात पण त्यासोबतच जास्त प्रमाणात याचा सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शेपगांचा पानांचे सेवन गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...