टॉयलेटमध्ये चहा पावडर टाकून बघाच; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
पावसाळ्यात वापरलेली चहा पावडर कधी टॉयलेट आणि सिंकसाठी वापरली आहे का? एकदा याचं कारण आणि त्याचे परिणाम जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल.

पावसाळ्यात कपडे सुकण्यासोबतच घर स्वच्छ आणि साफ ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. कारण पावसाळ्यात कुबट वास येत असतो. टॉयलेट-बाथरुममधून तर तो जास्त प्रमाणात येत असतो. आणि सतत साफ करणे तर शक्य होतं नाही. यावर एक सोपा पण प्रभावी उपायचा सध्या व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या सर्वांच्या घरी चहा पावडर तर असतेच, याच चहापावडरचा उपयोग करून तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.हा एक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पर्याय. विशेषत: डोंगराळ भागात, महिला अनेक वर्षांपासून असे घरगुती उपचार वापरत आहेत, जे केवळ प्रभावीच नाहीत तर पर्यावरणासाठी सुरक्षित देखील आहेत.
चहापावडरचा असाही उपयोग
आपण सहसा वपारलेली चहा पावडर नंतर फेकूनच देतो. पण या चहापावडरचा असाही उपयोग होऊ शकतो हा कोणीच विचार केला नसेल. या चहा पावडरचा वापर शौचालये आणि सिंक स्वच्छ करण्यात चमत्कारिकपणे काम करते. आपण अनेकदा वापरलेली चहापावडर कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण जर ती वाळवली तर ती एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिनर बनते. त्यात असलेले टॅनिन आणि नैसर्गिक तेल स्वच्छतेसाठी उपयुक्त आहे.
टॉयलेटमध्ये चहा पावडरचा वापर केल्यास काय होते?
टॉयलेट ब्रश वापरून चहा पावडरने टॉयलेट घासून घ्या. यामुळे जुने डाग निघून जाण्यास मदत होते. तसेच, त्याच्या सुगंधामुळे टॉयलेटमधील दुर्गंधीही दूर होते. अनेक लोकांनी ही पद्धत अवलंबली आहे आणि त्यांना आढळले आहे की ती रासायनिक नसलेल्या क्लीनरपेक्षा अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे. कारण केमिकल्सने भरलेल्या क्लिनर वापरण्यापेक्षा हे कधीही सुरक्षित आहे.
सिंक साफ करताना कसे वापरावे
जर चहा पावडर स्वयंपाकघरातील सिंकमध्ये टाकून ठेवली आणि काही वेळाने ब्रश किंवा घासणीने सिंक घासून काढल्यास साचलेले ग्रीस आणि घाण सहज निघून जाते. याशिवाय, सिंकमधून येणारा वासही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. विशेषतः लोखंडी किंवा स्टीलच्या सिंकमध्ये, त्याचा परिणाम आणखी चांगला दिसून आला आहे.
पर्यावरणपूरक आणि बजेट फ्रेंडली पर्याय
हा उपाय पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे, कारण त्यात कोणतेही हानिकारक रसायने वापरली जात नाहीत. दुसरीकडे, तो खिशालाही परवडणारा आहे. बाजारात उपलब्ध असलेली स्वच्छता क्लीनिंग प्रोडक्ट्स महागडी आणि केमिकल्सने भरलेली असतात. कधी कधी त्यांचा वासही इतका स्ट्रॉंग असतो की त्यामुळे त्रास होऊ लागतो. त्यामानाने हा घरगुती उपाय मोफत उपलब्ध आहे आणि तो खूप प्रभावी आणि सुरक्षितही आहे. उत्तराखंड, हिमाचल आणि ईशान्येकडील राज्यांमधील महिला प्राचीन काळापासून हा उपाय अवलंबत आहेत. चहापावडरचा दुहेरी वापर तेथील जीवनाचा एक भाग आहे. आता ही पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि देशाच्या इतर भागातील लोकांनीही ती अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाचं टीप
पण हा उपाय एकदा किंवा दोनदाच करा. कारण वारंवार हा उपाय केला तर चहा पावडर टॉयलेटच्या पाईपमध्ये अडकू राहण्याची शक्यता असते. ज्यामुळेwc blocked होऊ शकते.शौचालयात चहा पावडर टाकल्यास खालील समस्या येऊ शकतात. जर तुम्हाला रोजच चहा पावडरचा उपयोग करायचा असेल, तर ती भांडी किंवा इतर पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकते.