AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekend Plan | पुणेकरांनो, ‘विकेंड ट्रीप’चा प्लॅन करताय? जवळची ‘ही’ ठिकाणं तुमची वाट पाहतायत…

सध्या सगळेच लोक नवीन वर्षाच्या सुट्टीच्या योजना आखत आहेत. सरत्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अगदी विकेंडचा मुहूर्त लाभला आहे.

Weekend Plan | पुणेकरांनो, ‘विकेंड ट्रीप’चा प्लॅन करताय? जवळची ‘ही’ ठिकाणं तुमची वाट पाहतायत...
| Edited By: | Updated on: Dec 19, 2020 | 2:30 PM
Share

पुणे : सध्या सगळेच लोक नवीन वर्षाच्या सुट्टीच्या योजना आखत आहेत. सरत्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अगदी विकेंडचा मुहूर्त लाभला आहे. अशातच सगळे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नव्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता जवळच्या ठिकाणांना पसंती दिली जात आहे. पुणेकरांनो तुम्हीही विकेंड ट्रीपसाठी अशीच जवळची ठिकाण शोधत असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे (Best Weekend Destination For trip near pune).

‘विकेंड ट्रीप’साठी पुण्याजवळील काही खास ठिकाणं :

सिंहगड :

पूर्वीचा ‘कोंढाणा’ अर्थात आताचा ‘सिंहगड’ हा समस्त निसर्ग आणि गडप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकापासून 32 किमी अंतरावर सिंहगड वसला आहे. एसटी किंवा रिक्षाने तुम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचू शकता. यानंतर ट्रेकची योजना असल्यास गड चढू शकता किंवा इथल्या लोकल वाहनाने गडाच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत सहज पोहचू शकता. इथे तुम्ही एका दिवसांतही फिरू शकता. याशिवाय राहण्याची योजना असल्यास इथे तंबू टाकून राहून शकता. ऐतिहासिक वारसा आणि त्याच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

भाजा लेण्या :

पुण्यापासून जवळच लोणावळ्यात भाजा लेण्या आहेत. लोणावळा स्थानकापासून 15 किमी अंतरावर भाजा लेण्या स्थित आहेत. बस, रिक्षा, कॅबच्या सहाय्याने तुम्ही इथपर्यंत सहज पोहचू शकता. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आपण इथे फिरू शकता. इथल्या लेण्यांचा इतिहास जाणून घेऊ शकता. भाजा या गावापासून 400 फूट उंचीवर या लेण्या आहे. तिथे पोहोचण्यासाठी चालत जावे लागते.

मुळशी धरण :

पुणे रेल्वेस्थानापासून 53 किमी अंतरावर मुळशी धरण आहे. 1927मध्ये या धरणाचे बांधकाम करण्यात आले होते. वीज निर्मिती प्रकल्पात या धरणाचा मोठा वाटा आहे. सध्या मुळशी धरण हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. छान हिरव्यागार गवतावर बसून, खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासही बरेच लोक मुळशी धरणाला भेट देतात. धरणापासून जवळच टेंट कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध आहे. स्थानिक वाहनांनी तुम्ही मुळशी धरणापर्यंत पोहचू शकता (Best Weekend Destination For trip near pune).

पानशेत धरण :

मुळशी प्रमाणेच पुण्यातील पानशेत धरण देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पुणे रेल्वेस्थानकापासून साधारण 45 किली अंतरावर पानशेत धरण आहे. स्थानिक वाहनाने तुम्ही या धरणापर्यंत पोहचू शकता. धरणापासून जवळच टेंट कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध आहे.

महाबळेश्वर :

पुण्यापासून जवळचे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात पसंतीचे थंडहवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. इथले महादेवाचे आणि पंचगंगेचे मंदिर, वेण्णा तलाव, सनसेट पॉइंट याठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तसेच, स्ट्रॉबेरीची शेतं आणि स्थानिक बाजारात इतर फळांचा आस्वाद घेऊ शकता.

(Best Weekend Destination For trip near pune)

हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.