जपानी लोक क्षणात आळस आणि सुस्ती दूर करतात, काय आहे जपानी ट्रिक?; वाचा

आयुष्यात काही तरी वेगळं करायचं असेल तर त्यासाठी वेडं व्हावं लागतं असं सांगितलं जातं. परंतु, काही लोकांमध्येच हे वेडेपण असतं. पण इतर लोकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो. (By adopting this special technique, Japanese people remove laziness and lethargy in a pinch)

जपानी लोक क्षणात आळस आणि सुस्ती दूर करतात, काय आहे जपानी ट्रिक?;  वाचा
laziness

नवी दिल्ली: आयुष्यात काही तरी वेगळं करायचं असेल तर त्यासाठी वेडं व्हावं लागतं असं सांगितलं जातं. परंतु, काही लोकांमध्येच हे वेडेपण असतं. पण इतर लोकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो. त्यातही काही लोक ज्या कारणांसाठी वेडेपिसे होतात, तेही नंतर हळूहळू आळशी आणि सुस्त होतात. त्यांचा उत्साह मावळतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या एकूण सर्वच कामांवर होतो. त्यामुळे या लोकांमध्ये अपराधी भावनाही निर्माण होत असते.

तुम्ही या समस्येतून जात असाल तर तुमच्यासाठी जपानमधील लोकांची एक काइझेन टेक्निक घेऊन आलो आहोत. जपानी लोक या टेक्निकच्या आधारेच अॅक्टिव्ह राहत असतात आणि कामाला लागतात. काय आहे ही काइझेन टेक्निक? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

काइझेन काय आहे?

काइझेनला एका मिनिटाचा सिद्धांतही संबोधलं जातं. व्यक्तिगत सुधारण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जपानी लोक या सिद्धांताच्या आधारेच आळसावर मात करतात. या सिद्धांतात एका व्यक्तीला रोज एकाचवेळी एका मिनिटासाठी काइझेन टेक्निकचं पालन करावं लागतं. काइचा अर्थ बदल असा होता. तर झेनचा अर्थ हुशारी. जपानीज संस्था जपानीज ऑर्गनायजेशनल थिओरिस्ट अँड मॅनेजमेंट कन्सल्टंटचे मासाकी आइमा यांनी काइजेन टेक्निक शोधली आहे. कामाची क्वालिटी आणि व्यवस्थापनासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.

आपली मॅनेजमेंट स्किल्स वाढवण्यासाठी जपानी लोक काइझेन टेक्निकचा वापर करतात, असं मासाकी सांगतात. कोणत्याही सुधारणेशिवाय एकही दिवस जाता कामा नये हे या टेक्निकचं उद्दिष्टं आहे. काइझेन टेक्निक वापरण्यास सुरुवात केल्यास एक किंवा दोन दिवसात त्याचे परिणाम येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ नियमितपणे या टेक्निकचा वापर करावा लागतो.

काइझेनचं कार्य कसं चालतं?

काइझेन ही एक साधी आणि सरळ टेक्निक आहे. यात तुम्हाला रोज ठरलेल्या वेळेत एका मिनिटासाठी तुमच्या आवडीचं काम करावं लागतं. पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं किंवा अन्य कोणतंही काम तुम्ही करू शकता. तुम्हाला कितीही आळस आला असला तरी रोज ठरलेल्या वेळेतच या टेक्निकचा वापर करणं बंधनकारक आहे. तसेच ही कमिटमेंट कोणत्याही परिस्थितीत पाळाच.

घाई करू नका

एका मिनिटासाठी या टेक्निकचा वापर करताना घाई करू नका. तुम्हाला केवळ एक मिनिट द्यायचा आहे. कालांतराने तुम्हीच याचा वेळ वाढवाल. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या टेक्निकचा वापर करू शकते. ही टेक्निक करताना तुम्हाला काय हवं आहे आणि तुमचा उद्देश काय आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे.

दुसरी जपानी टेक्निक

जपानी संस्कृतीमध्ये अशा अनेक टेक्निक आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य एकदम चांगलं करू शकता. या टेक्निक आयुष्याची क्वालिटी सुधारण्याचं काम करत असतात. काइझेन तर तुमच्यातील आळसावर मात करत असते. तशीच केकीबो टेक्निक पैसे वाचवण्यासाठी उपयोगी असते. तर कोंमीरी टेक्निक घरांना संघटित काम करण्याचं काम करत असते.

 

संबंधित बातम्या:

Fashion Tips for Women : साडी आणि लेहेंगासोबत कॅरी करा ज्वेल नेक ब्लाउज, नाही पडणार दागिन्यांची गरज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI