AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षांमुळे बर्ड फ्लू मानवांमध्ये पसरतोय का? हाय अलर्ट जारी

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण त्याहूनही जास्त चिंता याची आहे की, बर्ड फ्लू मानवांमध्ये पसरू शकतो का? आणि जर हा आजार माणसांना झाला तर त्याची लक्षणे काय असू शकतात. हे जाणून घेऊयात

पक्षांमुळे बर्ड फ्लू मानवांमध्ये पसरतोय का? हाय अलर्ट जारी
| Updated on: Jan 27, 2025 | 12:39 PM
Share

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. एवढच नाही तर लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4000 हून अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे हाय अलर्ट

त्यामुळे पुन्हा एकदा इन्फ्लूएंझा विषाणू सध्या मोठ्या चिंतेचे कारण ठरत आहे आणि 2025 मध्ये यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असं म्हटलं जातं आहे. हा इन्फ्लूएंझा म्हणजे त्याला H5N1 म्हणतात. जेव्हा पक्षी किंवा प्राण्यांमध्ये इन्फ्लूएंझा प्रकरणे वाढू लागतात, तेव्हा नेहमीच काळजी असते की त्याचा परिणाम माणसांवरही होऊ शकतो. पण खरंच, बर्ड फ्लूचा संसर्ग मानवांना होऊ शकतो का? आणि त्याची लक्षणे काय असतात? आणि हा आजार जर माणसांमध्येही पसरत असले तर तो आजार मानवांसाठी किती धोकादायक आहे? हे पाहुयात.

आधी हे जाणून घेऊयात की, बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लू, ज्याला एव्हियन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात. हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. त्याच्या H5N1 प्रकारामुळे मानवांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो. तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर इतर प्राण्यांना आणि मानवांनाही परिणाम करू शकतो.

बर्ड फ्लू मानवांमध्ये कसा पसरतो?

संक्रमित पक्ष्यांशी संपर्क: संक्रमित पक्ष्यांना स्पर्श केल्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने. तसेच संक्रमित प्राण्यांचे मांस किंवा अंडी खाल्ल्याने: कमी शिजवलेले मांस किंवा न उकळलेले अंडी खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. तसेच कच्च्या दुधाद्वारेही या आजाराचे संक्रमण होण्याची शक्यता आहे.

मानवांमध्ये जर बर्ड फ्लू पसरलाच तर त्याची लक्षणे काय?

माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यावर ताप हे महत्त्वाचं लक्षण आहे. जास्त ताप आणि थंडी वाजून येणे. स्नायू दुखणे डोकेदुखी आणि थकवा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे डोळ्यांत जळजळ होणे पोटदुखी आणि अतिसार

ही सर्व लक्षणे माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची आहे

बर्ड फ्लू रोखायचा कसा?

पक्ष्यांशी संपर्क टाळणे गरजेचे आहे विशेषतः संक्रमित भागात. पोल्ट्री उत्पादने पूर्णपणे शिजवल्यानंतर खावे स्वच्छता पाळायला हवी संक्रमित प्राण्यांपासून दूर रहाणे

बर्ड फ्लू या आजाराचा माणसांवर गंभीर परिणाम होतात का?

हा आजार मानवांमध्ये दुर्मिळ आहे, परंतु संसर्ग झाल्यास तो गंभीर होऊ शकतो. त्याची लक्षणे सौम्य ते जीवघेण्यापर्यंत असू शकतात. म्हणून, जागरूकता बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच हा आजार महाराष्ट्रातून जाईपर्यंत तरी पक्ष्यांपासून अंतर ठेवणेच बरे आहे.

समजा कोणाच्या बाल्कनीत पक्ष्यांनी घाण केली असेल, किंवा त्यांची विष्ठा असेल तर ती लगेचच साफ करावी. यावेळी आपली स्वत:ची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्क घालावा जेणेकरून श्वासावाटे ते जंतू आपल्या शरीरीत जाणार नाही. तसेच ती जागा साफ करताना हातात नेहमी ग्लोज घालावेत. तसेच जागा साफ केल्यानंतर आपलं शरीर नीट स्वच्छ केलं पाहिजे.

(डिस्केमर: वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून घेण्यात आली असून. त्यामुळे तुम्हाला काही याविषयी प्रश्न असतील किंवा कोणते लक्षण जाणवली तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

 

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.