त्वचा चमकदार बनवण्यापासून ते केसांच्या वाढीपर्यंत… ‘या’ 5 गोष्टींसाठी एरंडेल तेल आहे फायदेशीर, जाणून घ्या
एरंडेल तेल हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते केसांच्या योग्य वाढीसाठी त्याचा वापर करतात.

नैसर्गिक उपचार किंवा घरगुती उपचारांबद्दल बोलायचे झाले तर, एरंडेल तेल हे एक रामबाण उपाय आहे. प्राचीन काळापासून एरंडेल तेलाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर आयुर्वेदातही याचा वापर अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो. हे तेल अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात रिसिनोलिक ॲसिड नावाचे फॅटी ॲसिड असते, जे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. एरंडेल तेलात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात.
आधुनिक जीवनशैलीत, केस गळणे, अकाली वृद्धत्व यासारख्या अनेक प्रकारच्या समस्यांनी लोकं त्रस्त आहेत. हे टाळण्यासाठी, बहुतेक लोक अजूनही नैसर्गिक गोष्टींवर जास्त अवलंबून असतात. खरं तर, यामागील कारण असे आहे की नैसर्गिक गोष्टी जरी उशिरा परिणाम दाखवत असल्या तरी त्यांचे दुष्परिणाम क्वचितच दिसून येतात. तर आजच्या लेखात आपण एरंडेल तेलाचे पाच उपयोग काय आहेत ते जाणून घेऊया?
nlm नुसार, FDA ने एरंडेल तेलाला रेचक म्हणून मान्यता दिली आहे, म्हणजेच ते बद्धकोष्ठता आणि केसांसाठी फायदेशीर आहे. एरंडेल तेल लिपिड मेटाबोलिझम आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. या लेखात आपण एरंडेल तेल कोणत्या 5 प्रकारे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत कसा वापरू शकता हे जाणून घेऊ.
केसांची वाढ करण्यास उपयुक्त
एरंडेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ते स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. त्यात केसांची वाढ देखील सुधारते. मात्र हे तेल खूप जड असल्याने याचा वापर करताना नेहमी नारळाच्या तेलात मिक्स करून लावा आणि प्रमाण योग्य ठेवा.
त्वचेला मॉइश्चरायझर
एरंडेल तेल एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. कोरड्या आणि भेगा पडलेल्या त्वचेवर लावल्यास त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. हे विशेषतः टाचांवर आणि कोपरांवर प्रभावी आहे.
जखम आणि सूज कमी करते
हेल्थ लाईनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एरंडेल तेलात असलेले रिसिनोलिक अॅसिड हे घटक सुज कमी करण्यास मदत करते. याशिवाय तुम्ही या तेलाचा वापर किरकोळ जखमा भरण्यासाठी देखील करू शकता. हे तेल लावल्याने स्नायूंच्या वेदनांपासूनही आराम मिळू शकतो.
त्वचेसाठी फायदे
हेल्थ लाईनच्या मते एरंडेल तेल हे त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. तुम्ही ते तुमच्या त्वचेला अनुकूल असलेल्या हलक्या तेलांमध्ये मिक्स करून लावू शकता. एरंडेल तेल त्वचेला पोषण देते आणि ती मऊ ठेवते. ते लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
भुवया जाड करण्यासाठी
एरंडेल तेल केसांची वाढ सुधारते. अशातच ज्या लोकांच्या पापण्या आणि भुवया खूप पातळ आहेत, तर तुम्ही एरंडेल तेल लावू शकता. यापासून भुवया जाड होतील आणि केसांची वाढ नीट होईल. मात्र हे तेल खूप मर्यादित प्रमाणात वापरा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
