मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी, पाठीच्या कण्यावर गाठ असलेल्या लहानग्यावर केले यशस्वी उपचार

| Updated on: Mar 15, 2021 | 1:44 PM

मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलने (Wockhardt Hospital) एक यशस्वी कामगिरी केली आहे.

मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी, पाठीच्या कण्यावर गाठ असलेल्या लहानग्यावर केले यशस्वी उपचार
Follow us on

मुंबई : मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलने (Wockhardt Hospital) एक यशस्वी कामगिरी केली आहे. वरुण नावाच्या मुलाला जन्मताच पाठीवर लिंबाएवढी एक गाठ होती. पाठीचा कणा विकसित होण्याच्या क्रियेत काही जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे असे झाले होते आणि यावर यशस्वी शस्त्रक्रिया वॉकहार्ट हॉस्पिटलमार्फत करण्यात आली. (Central’s Wockhardt Hospital, successful treatment of a child with a lump on the spinal cord)

वरुण वारंवार पडत होता कारण त्याच्या पाठीचा कणा ताणला जात होता. परिणामी आतड्याच्या व मूत्राशयाच्या कार्यासाठी जबाबदार मज्जातंतूंमध्ये बिघाड होत होता तसेच कमरेखालील अवयवांमधील शक्तीही कमी होत होती. मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील ब्रेन अँड स्पाइन सर्जन डॉ. माझदा के. तुरेल यांच्याकडे वरूणला आणण्यात आले आणि काही दिवसांतच त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.

आता वरुणची प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. त्याच्या पायांची शक्ती मात्र, अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ववत झाली आणि त्याचे पडणे बंद झाले. न्युरल ट्युब दोषांचे जागतिक स्तरावरील प्रचलन (इन्सिडन्स) परीक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येनुसार हजारात एक ते शंभरामध्ये एक अशा श्रेणीत बदलते. भारत या श्रेणीच्या मध्यावर कुठेतरी आहे. या दोषामागे जनुकीय कारण तर आहेच, शिवाय गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात फॉलिक अॅसिड पुरेशा प्रमाणात न घेतल्यामुळे या दोषाचा धोका वाढतो.

संबंधित बातम्या : 

Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!

Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे

(Central’s Wockhardt Hospital, successful treatment of a child with a lump on the spinal cord)