Chinese manjha |  ‘चीन’मुळे नव्हे, तर ‘या’मुळे चायनीज मांज्यावर बंदी, जाणून घ्या या मागचे कारण…

चीनी मांजा इतका धोकादायक आहे की, दरवर्षी यामुळे बरेच लोक मृत्यूमुखी पडतात आणि बरेच लोक जखमी देखील होतात.

Chinese manjha |  ‘चीन’मुळे नव्हे, तर ‘या’मुळे चायनीज मांज्यावर बंदी, जाणून घ्या या मागचे कारण...

मुंबई : मकर सक्रांतीचा सण जवळ आल्याबरोबर बाजारात पतंग दिसण्यास सुरूवात झाली आहे. बर्‍याच शहरांत खास पतंगांचा बाजारही भरतो. मकर संक्रांत जवळ आल्यामुळे ‘चीनी मांजा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजस्थान सरकारने चिनी मांज्यावर बंदी घातली असून, कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरवर्षी पंतगाच्या हंगामात चिनी मांजाचा गवगवा असतो. अशा वेळी बर्‍याच लोकांचा असा समाज होतो की, हा मांजा चीनवरून आला आहे आणि चीनी मालावर बहिष्कार म्हणून यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, हे यामागचे खरे कारण नाही (Chinese Manjha more dangerous than regular manjha know details here).

या मांज्यावरील बंदी चीनशी संबंधित नाही. वास्तविक, हा मांजा इतका धोकादायक आहे की, दरवर्षी यामुळे बरेच लोक मृत्यूमुखी पडतात आणि बरेच लोक जखमी देखील होतात. हा मांजा अतिशय धोकादायक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आहे. जाणून घेऊया हा मांजा इतर मांज्यांपेक्षा कसा वेगळा ठरतो…

कसा बनवला जातो चीनी मांजा?

चीनी मांज्याला काही लोक प्लास्टिक मांजा देखील म्हणतात. हा प्लास्टिक मांजा किंवा चायनीज मांजा हा अन्य मांज्याप्रमाणे धाग्याने बनवला जात नाही. तर, यात नायलॉन आणि धातूच्या पावडरचा वापर केला जातो. प्लास्टिकसदृश्य दिसणारा हा मांजा ताणण्यायोग्य असतो. ज्यामुळे ढील दिल्यावर तो तुटण्याऐवजी वाढतो. तसेच, या मांज्याला कापणे फार कठीण असते..

नायलॉनसारख्या दिसणाऱ्या या धाग्यावर काचेच्या किंवा लोखंडाच्या पावडरने धार लावली जाते. ज्यामुळे हा मांजा आणखी प्राणघातक बनतो. हा मांजा साध्या मांजापेक्षा खूप वेगळा आहे. जेव्हा आपण या मांजासह पतंग उडवतो तेव्हा एक वेगळाच कंप निर्माण होतो (Chinese Manjha more dangerous than regular manjha know details here).

का आहे धोकादायक?

चीनी मांजा खूप तीक्ष्ण आहे आणि विशेष म्हणजे तो विद्युत वाहक देखील आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच करंट लागण्याचा धोका देखील निर्माण होतो. तसेच, तो सहज तुटत नसल्याने एखाद्या पक्षाच्या किंवा दुचाकी स्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. दरवर्षी यामुळे अनेक अपघात होतात, तसेच अनेक लोक जखमीही होतात. या उलट सामान्य मांजा सहज तोडला जातो.

साधा मांजा आणि चीनी मांजातील फरक?

साधा मांजा हा धाग्याने बनलेला असतो आणि त्यानंतर त्यावर काचेचा थर चढवला जातो. काचेच्या थरामुळे सामान्य मांजादेखील खूप धोकादायक असतो, परंतु तो सहज तोडता येतो. त्यामुळे तो चीनी मांज्यापेक्षा कमी धोकादायक मानला जातो. चिनी मांझा लेझर मटेरियलपासून बनवला जात असल्यामुळे तो तोडणे फार कठीण आहे, म्हणून तो अधिक धोकादायक आहे.

तरीही लोकांची चीनी मांजाला पसंती का?

जेव्हा लोक पतंग उडवतात, तेव्हा स्वतःचा पतंग वाचवून इतरांचा पतंग कापणे हा त्यांचा उद्देश असतो. यामुळे अनेकांना हा मांजा आवडतो. या मांजामुळे पतंग सहजपणे खंडित होत नाही आणि बर्‍याच काळासाठी उडवता येतो. चीनी मांजा हा चीनमध्ये नाही तर, भारतातही बनवला जातो. त्याचे कारखाने सर्वत्र आहेत, ज्यावर सरकार वेळोवेळी कारवाई देखील करते.

(Chinese Manjha more dangerous than regular manjha know details here)

हेही वाचा :

Published On - 7:10 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI