उन्हाळ्यात फक्त ‘या’ एका लाडूचे करा सेवन, काही वेळातच थकवा, अशक्तपणा, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

उन्हाळ्यात शरीर लवकर थकू लागते आणि अनेकांना अशक्तपणा, सुस्ती, बद्धकोष्ठता आणि अंगदुखी यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी आपल्या आहारात हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. तर आजच्या लेखात आपण अशाच एका आरोग्यदायी लाडूबद्दल जाणून घेऊयात जे उन्हाळ्यात शरीर तंदुरस्त ठेवतील.

उन्हाळ्यात फक्त या एका लाडूचे करा सेवन, काही वेळातच थकवा, अशक्तपणा, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम
फक्त 'या' एका लाडूचे करा सेवन
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 22, 2026 | 2:36 PM

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर लवकर थकते. त्यात उष्णतेमुळे अनेकांना अशक्तपणा, सुस्ती, बद्धकोष्ठता आणि अंगदुखीचा त्रास जाणवतो. तीव्र ऊन, घाम आणि बदलत्या आहारामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. अशा वेळी आहारात हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. अख्ख्या हिरव्या मुगापासून बनवलेले लाडूचे सेवन करणे हे एक चविष्ट पर्याय आहे. हे लाडू चविष्ट असून शरीराला ऊर्जा देण्यास आणि रोजचा थकवा कमी करण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात हिरव्या मुगाचे लाडू खाण्याचे फायदे

संपूर्ण हिरवे मूग आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये प्रथिने , फायबर आणि शरीराला मजबूत करण्यास मदत करणारी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. उन्हाळ्यात ते पचायला हलके मानले जातात. त्यात बदाम, काजू आणि कलिंगडाच्या बिया असल्याने त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. हे सर्व सुकामेवा शरीर मजबूत करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जातात.

हिरव्या मुगाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • 1 कप अख्खे हिरवे मूग
  • 10 ते 12 बदाम
  • 8 ते 10 काजू
  • 1 मोठा चमचा कलिंगडाच्या बिया
  • 5 मोठे चमचे घरगुती तूप
  • 1 कप खडीसाखर
  • अर्धा कप ताजी मलई
  • 1 चमचा वेलची पूड

हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे?

  • सर्वप्रथम, अख्खे हिरवे मूग स्वच्छ धुवून मंद आचेवर चांगले भाजून घ्या. त्याला सुगंध येईपर्यंत भाजत राहा. ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर बदाम, काजू आणि कलिंगडाच्या बिया हलक्या भाजून घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा.
  • आता एका कढईत तूप गरम करा. त्यात वाटलेले मूग टाका आणि काही मिनिटे परतून घ्या. हे मुगाचं सारण सोनेरी रंगाचे होऊ लागल्यावर त्यात बारीक कापलेला सुका मेवा टाका. नंतर त्यात खडीसाखर बारीक करून टाका आणि मिश्रण चांगले मिक्स करा.
  • आता या मिश्रणात ताजी मलई आणि वेलची पूड टाकून चांगले मिक्स करा.
  • मिश्रण कोमट झाल्यावर हाताने लाडू बनवा. गरज वाटल्यास थोडे अधिक तूप टाकू शकता.

हे लक्षात ठेवा

हे लाडू निश्चितच पौष्टिक आहेत, पण ते सर्व आजारावर रामबाण उपाय म्हणून वापरू नयेत. उन्हाळ्यात ते प्रमाणात खावेत आणि आपल्या आरोग्यानुसार त्यातील घटकांचे प्रमाण बदलावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us