AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटासाठी वरदान आहे सीताफळ, जाणून घ्या त्याचे 5 मोठे फायदे

सीताफळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असे फळ आहे. याच्या सेवनाने अनेक मोठे फायदे होऊ शकतात. सीताफळ खाल्ल्याने तुम्हाला अनेक गोष्टींची कमतरता भरुन काढता येते. सीताफळमध्ये अनेक रोगप्रतिकार शक्ती वाढणारे गुण देखील आहेत, जाणून घ्या त्याचे पाच मोठे फायदे काय.

पोटासाठी वरदान आहे सीताफळ, जाणून घ्या त्याचे 5 मोठे फायदे
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 09, 2024 | 8:10 PM
Share

फळे रोज खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. असेच एक महत्त्वाचे फळ म्हणजे सीताफळ. सीताफळाला कस्टर्ड ऍपल, शुगर ऍपल, चेरीमोया, कस्टर्ड ऍपल इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. सीताफळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह इत्यादी गोष्टी असतात. जे हृदय आणि मधुमेह रुग्ण या दोन्हींसाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय सीताफळचे आणखी काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

1.व्हिटॅमिन सी

सीताफळ हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असते जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. त्यामुळे हृदयाचे विकार आणि मधुमेहासाठी ते खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही त्याचे सेवन करु शकता.

2. डोळे निरोगी ठेवते

सीताफळ हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले ल्युटीन हे अँटिऑक्सिडेंट आहे. जे डोळ्यामध्ये आढळते. फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या दूर होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सीताफल हे खूप फायदेशीर आहे.

3. रक्तदाब नियंत्रित करते

सीताफळ हे रक्तदाबासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करते. सीताफळ खाल्ल्याने रक्तदाब कमी राहतो. याच्या मदतीने हृदयविकार टाळणे देखील शक्य आहे.

4. दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर

दमा असलेल्या लोकांसाठी सीताफळ हे खूप फायदेशीर आहे. यामुळे फुफ्फुसातील सूज दूर होते, याशिवाय ॲलर्जीची समस्याही कमी होते. सीताफळचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते.

5. पचनशक्ती सुधारते

सीताफळ हे फायबरने समृद्ध असे फळ आहे. सीताफळ पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

डिस्क्लेमर : वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही आरोग्य विषयक समस्या असल्यास कृपया तज्ज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.