उन्हाळ्यात सत्तूपासून बनवा ‘हे’ 4 चविष्ट पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा

सत्तू हा असा पदार्थ आहे जो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो आणि उष्माघातापासून वाचवतो. याशिवाय यात प्रथिने भरपूर असल्याने, ते स्नायूंसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

उन्हाळ्यात सत्तूपासून बनवा हे 4 चविष्ट पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 06, 2025 | 9:51 PM

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारावर अधिक लक्ष द्यावे लागते. विशेष म्हणजे शरीर थंड राहण्यास आणि ऊर्जावान राहण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. यासाठी उन्हाळ्यात तुम्ही आहारात भाजलेल्या चण्यापासून तयार केलेल्या सत्तूच्या पदार्थांचा समावेश केल्याने तुम्हाला उष्माघातापासून संरक्षण मिळते, शिवाय पचनक्रिया सुधारते आणि शाकाहारी लोकांसाठी सत्तू हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. याचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते आणि स्नायूही मजबूत होतात. हे रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते. यासाठी भाजलेले चणे घेऊन त्याची बारीक पुड करून सत्तू तयार करा. हे सत्तू घरच्या घरी बनवल्याने भेसळीपासून दूर रहाल. यासाठी उन्हाळ्यात तुम्ही सत्तूपासून काही पदार्थ तुमच्या आहारात समावेश करू शकता. तसेच तुम्ही सत्तु पासून हे काही पदार्थ ट्राय करू शकता

सत्तूपासून बनवलेला लिट्टी चोखा हा संपूर्ण देशात बिहारची ओळख बनला आहे. पारंपारिक पद्धतीने बनवलेला हा चविष्ट पदार्थ आज एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. याशिवाय सत्तूपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात जे उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला आजच्या लेखात त्या पदार्थाबद्दल जाणून घेऊया.

सत्तू चोखा बनवा

कमी तेलात बनवलेल्या सत्तूच्या पदार्थाबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही सत्तू चोखा बनवू शकता. ही इतकी साधी डिश आहे की त्यासाठी तुम्हाला स्टोव्ह पेटवण्याचीही गरज नाही. एका प्लेटमध्ये सत्तू घ्या, त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळे किंवा पांढरे मीठ, लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. त्यात थोडे मोहरीचे किंवा तुम्ही वापरत असलेलक तेल त्यात मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून लाडूसारखे बनवा. व यांचा आहारात समावेश करा.

सत्तूचा मसालेदार सरबत

उन्हाळ्यात ताजेतवाने पेयांबद्दल बोलायचे झाले तर, सत्तू सरबत आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. कारण सत्तु सरबत शरीराला आतून थंड ठेवते. यासाठी सत्तू थंड पाण्यात मिक्स करा, ज्यामध्ये कांदा, लिंबाचा रस, भाजलेले जिरे पूड, मीठ, हिरवी मिरची घालून थंडगार सर्व्ह करा.

सत्तू परांठा

तुम्ही सत्तू पराठा देखील बनवू शकता. फिटनेसच्या दृष्टिकोनातून यामध्ये तेलाऐवजी तूप वापरणे चांगले. सत्तू पराठे इतके चविष्ट असतात की मुलेही ते आनंदाने खातात.

सत्तू ताक

तुम्ही सत्तू ताक हे उन्हाळ्यात पेय बनवून ते पिऊ शकता. हे ताजेतवाने, आरोग्यदायी देखील आहे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करेल. यासाठी कोथिंबीर आणि पुदिना नीट बारीक वाटून घ्या. आण‍ि आता ताकात सत्तू पावडर मिक्स करा आणि त्यात कोंथिबीर-पुदिना पेस्ट काळे मीठ, चाट मसाला घालून मिक्स करावे. आता त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि सर्व्ह करा.