कोरोना विषाणू आणि टायफॉइडच्या लक्षणांमध्ये गोंधळ? जाणून घ्या यातील फरक आणि त्यावरील उपाय

कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना या आजाराव्यतिरिक्त आणखी एक आजार लोकांना त्रास देत आहे तो म्हणजे टायफॉइड. सगळीच नाहीत, परंतु टायफॉइडची अनेक लक्षणे कोरोना विषाणू सारखीच आहेत.

कोरोना विषाणू आणि टायफॉइडच्या लक्षणांमध्ये गोंधळ? जाणून घ्या यातील फरक आणि त्यावरील उपाय
कोरोना आणि टायफॉइड
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 1:11 PM

मुंबई : कोरोना साथीच्या काळादरम्यान, जगभरातील सर्व लोक इतर आजारांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि केवळ कोरोनाच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना या आजाराव्यतिरिक्त आणखी एक आजार लोकांना त्रास देत आहे तो म्हणजे टायफॉइड. सगळीच नाहीत, परंतु टायफॉइडची अनेक लक्षणे कोरोना विषाणू सारखीच आहेत आणि लोक टायफॉइडला यालाही कोरोनाच मानत आहेत (Difference between Corona Virus Symptoms and Typhoid symptoms).

जे लोक आधीच आजारी आहेत त्यांच्यासाठी टायफॉइड ताप हा पाचक तंत्राच्या जंतुसंसर्गामुळे आणि रक्त परिसंवादामुळे होतो. टायफॉइड हा एक पाणी आणि अन्नाद्वारे होणारा आजार आहे, ज्यामध्ये साल्मोनेला टायफी नावाचे जीवाणू दूषित पाणी आणि अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करून पाचन तंत्रावर परिणाम करतात.

टायफॉइड म्हणजे काय?

टायफॉइड हा जिवाणूजन्य रोग आहे, जो शिळे अन्न खाल्ल्याने किंवा दूषित पाणी पिण्यामुळे होतो. साल्मोनेला टायफी नावाचे त्याचे जीवाणू दूषित पाण्याद्वारे आणि अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या शरीराच्या पाचन तंत्रावर परिणाम करतात. टायफॉइड कारणीभूत जीवाणू पाण्यात किंवा कोरड्या पृष्ठभागावर आठवडाभर टिकतात आणि ज्याच्या संपर्कात येतात, त्यांना याचा संसर्ग होऊ शकतो.

टायफॉइडची लक्षणे :

1) अशक्तपणा जाणवते

2) भूक न लागणे

3) डोके दुखणे

4) शरीरात वेदना

5) सर्दी आणि ताप

6) सुस्तपणा

7) जुलाब

8) पाचन तंत्रात समस्या

9) 102 ° ते 104 ° सेल्सीअस ताप

जर आपल्याला ही सर्व लक्षणे दिसत असतील तर, प्रथम स्वत:ची कोरोना चाचणी करू घ्या आणि जर या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टायफॉइडसाठीची औषध सुरू करा.

(Difference between Corona Virus Symptoms and Typhoid symptoms)

काळजी घ्या :

– स्वच्छतेची काळजी घ्या

– गरम पाणी आणि साबणाने हात धुवा

– गरम पाणी प्या

– कच्च्या गोष्टी खाऊ नका

– अन्न चांगले शिजवा, कच्चे अन्न खाणे टाळा

– लोकांपासून दूर रहा, जेणेकरुन संक्रमणाचा प्रसार होण्याचा धोका कमी होईल

– इतरांशी अन्न शेअर करू नका

– लोणी, पेस्ट्री, तूप, तळलेले पदार्थ आणि मिठाई इत्यादी पदार्थांचे सेवन करणे टाळा

– जड मांस, मासे आणि मटण खाणे टाळा

– दारू, मद्य किंवा सिगारेटचे सेवन करू नका

(Difference between Corona Virus Symptoms and Typhoid symptoms)

कोरोनाची लक्षणे

सर्वात सामान्य लक्षण :

1) ताप

2) कोरडा खोकला

3) थकवा

कमी सामान्य लक्षणे :

1) वेदना आणि दु: ख

2) घसा खवखवणे

3) अतिसार

4) डोळे येणे

5) डोके दुखणे

6) चव न लागणे

7) त्वचेवर पुरळ, किंवा बोटांवर पुळ्या

तीव्र लक्षणे :

1) धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे

2) छातीत दुखणे किंवा जडपणा

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Difference between Corona Virus Symptoms and Typhoid symptoms)

हेही वाचा :

Health Tips : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा !

कलिंगड खाताना अजिबात करु नका या चुका, अन्यथा होऊ शकते त्रासदायक

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.