AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Triphala Powder Effects : तुम्हीही नियमितपणे त्रिफळा चुर्णाचं सेवन करता? मग जाणून घ्या फायदे तोटे

तुम्हाला जर बद्धकोष्ठता किंवा गॅस आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, जर तुम्ही त्रिफळा चुर्णाचे सेवन करू शकता. त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Triphala Powder Effects : तुम्हीही नियमितपणे त्रिफळा चुर्णाचं सेवन करता? मग जाणून घ्या फायदे तोटे
| Edited By: | Updated on: Feb 07, 2025 | 11:56 PM
Share

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात तेलकट आणि जंक फूड खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी सारख्या अनेक समस्या होऊ शकतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक औषध उपलब्ध आहेत. पंरतु या औषधांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुम्ही त्रिफळा चुर्णाचे सेवन करू शकता.

आयुर्वेदानुसार, त्रिफळा चुर्ण खाण्याचे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला जर अॅसिडिटी किंवा अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात त्रिफळा चुर्ण खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.

त्रिफळा पावडरमध्ये रेचक गुणधर्म असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, परंतु त्रिफळा चुर्णाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटात जळजळ निर्माण होऊ शकते. ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते अशा लोकांना त्रिफळा चुर्णामुळे अनेक समस्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात त्रिफला खाल्ल्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि अतिसार यांच्या सारखे लक्षणे दिसून येतात. त्रिफळा चुर्णाचे जास्त सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो त्याचे मुख्य कारण म्हणजे त्रिफळा चुर्ण तुमच्या आतड्यांना उत्तेजित करते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते. अतिसारामुळे तुमच्या शरीरातील डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, म्हणून त्रिफळा पावडर घेताना योग्य प्रमाण घेणे महत्वाचे आहे. काही लोकांना त्रिफळा चुर्णची अ‍ॅलर्जी असू शकते. त्वचेवर पुरळ, खाज सुटणे, सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे सर्व अ‍ॅलर्जीचे लक्षण आहेत. त्रिफळा चुर्ण खाल्ल्यानंतर तुम्हाला अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसली तर तुम्ही ते ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना त्रिफळा चुर्णाचे सेवन करणे टाळावे, कारण त्यात असे अनेक घटक असतात ज्यामुळे गर्भात किंवा आईच्या दुधात जाऊ शकतात. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर त्रिफळा चुर्ण घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

त्रिफळा चुर्ण खाण्याचे फायदे :

त्रिफळा चूर्णामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे, हृदयविकाराच्या काही आजारांपासून संरक्षण मिळते. त्रिफळा चूर्णामुळे पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. त्रिफळा चूर्णामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहते. त्रिफळा चूर्णामुळे आंखींची समस्या दूर होते. त्रिफळा चूर्ण खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्रिफळा चूर्ण मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.

मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.