टॉयलेट पेपर फक्त बाथरूमसाठी नाही! जाणून घ्या त्याचे इतर ‘स्मार्ट’ उपयोग
टॉयलेट पेपरचा वापर फक्त बाथरूमपुरता मर्यादित नसतो. या रोलचा उपयोग घराच्या अनेक कामांसाठी करता येतो. चला तर मग, बाथरूमपासून ड्रॉइंग रूमपर्यंत त्याचा कसा वापर करता येईल ? ते पाहूया.

टॉयलेट पेपर म्हटलं की आपल्याला फक्त बाथरूम आठवतं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की टॉयलेट पेपरचा वापर घराच्या इतर कामांसाठीही खूप प्रभावीपणे करता येतो. यामुळे तुमची अनेक कामे सोपी होतात. चला, तर मग टॉयलेट पेपरचे असे काही जबरदस्त उपयोग जाणून घेऊया, जे तुमच्या घरातील अनेक समस्या चुटकीसरशी सोडवतील.
कीटक आणि मुंग्या दूर ठेवा
टॉयलेट पेपरच्या मदतीने तुम्ही घरातून कीटक, मुंग्या आणि डास दूर ठेवू शकता. यासाठी पाणी उकळून त्यात टॉयलेट पेपरचे तुकडे टाका. पेपर मऊ झाल्यावर त्यात कॉफी पावडर आणि दालचिनी पावडर मिसळा. हे मिश्रण गोळ्यांसारखे बनवून घराच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे कीटक आणि मुंग्या घरात येणार नाहीत.
फ्रीज आणि कपाटांना सुगंधी ठेवा
पावसाळ्यात घरात, कपाटात किंवा फ्रीजमध्ये एक प्रकारचा दमट वास येतो. हा वास घालवण्यासाठी टॉयलेट पेपर रोलमध्ये काही थेंब इसेन्शियल ऑइल टाका. त्यानंतर हा रोल कपाटात किंवा फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कोणतीही केमिकल नसतानाही तुमच्या घरात आणि वस्तूंना एक ताजेपणा जाणवेल.
बिया अंकुरित करण्यासाठी मिनी प्लांटर
जर तुम्हाला बागकाम करण्याची आवड असेल, तर टॉयलेट पेपर तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. टॉयलेट पेपर रोलचे छोटे-छोटे तुकडे कापून त्यात बिया भरा आणि त्यावर पाणी शिंपडा. काही दिवसांनी जेव्हा बिया अंकुरित होतील, तेव्हा तो रोल मातीसह कुंडीत लावा. यामुळे तुमचं किचन गार्डन अगदी सोप्या पद्धतीने सुरू होईल.
काचेच्या वस्तूंची साफसफाई
घरातल्या काचेच्या वस्तू, आरसे, टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन साफ करण्यासाठी टॉयलेट पेपर खूप उपयोगी आहे. सुती कापडाने साफ केल्यास डाग राहतात, तर वृत्तपत्राने साफ केल्यास शाईचे डाग येऊ शकतात. टॉयलेट पेपर मऊ असल्यामुळे काचेवर कोणताही ओरखडा न पडता ती स्वच्छ होते.
पक्ष्यांसाठी खाद्य पात्र
जर तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायला आवडत असेल, तर टॉयलेट पेपरचा रोल वापरून तुम्ही सोपं बर्ड फीडर बनवू शकता. रोलवर पीनट बटर लावा आणि त्यावर पक्ष्यांचे खाद्य चिकटवा. हे रोल झाडावर किंवा खिडकीच्या गजाला लटकवा. यामुळे पक्षी दाणा खायला येतील.
सॉकेट आणि प्लग स्वच्छ करा
टॉयलेट पेपरची पातळ आणि मऊ थर असल्यामुळे सॉकेट आणि प्लगमध्ये साठलेली धूळ सहज काढता येते. पेपरचा छोटा गोळा करून तुम्ही सॉकेटमधील धूळ साफ करू शकता. हे सुरक्षित आणि सोपे आहे.
अशा प्रकारे, टॉयलेट पेपरचा वापर फक्त बाथरूमपुरता मर्यादित न ठेवता, तुम्ही इतर अनेक कामांसाठी करू शकता.
