Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही. आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या
पाणी
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 4:42 PM

नवी दिल्ली : सध्या आपल्याला कोरोना महामारीपासून बचाव करायचा आहे आणि आपली प्रतिकारशक्ती बळकट करायची आहे. यासाठी दररोज ताजी फळे खाणे फार महत्वाचे आहे. जर जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषण तत्वयुक्त फळ दररोज मोठ्या प्रमाणात खाल्ली तर एखाद्या व्यक्तीचा आजारी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दररोजच्या आहारात हंगामी आणि ताजी फळे समाविष्ट करण्याची देखील डॉक्टर शिफारस करतात. परंतु आपल्याला प्रत्येकाकडून एक सामान्य सल्ला मिळेल, तो असा की फळे खाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. जाणून घ्या यामागचे कारण काय आहे. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

पोटात पेटके किंवा गॅसची समस्या होऊ शकते

बहुतेक फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. साखर आणि यीस्टची मात्रा फळांमध्ये जास्त असते, ज्यास योग्य पचवणे आवश्यक आहे. आपण जे जेवण खातो ते पोटापर्यंत पोचल्यावर आपले पोट ते पचवण्यासाठी एक प्रकारचे अॅसिड सोडते. परंतु जर आपण फळ खाल्ले आणि ताबडतोब पाणी प्यायले तर पाण्यामुळे त्या आम्लाची क्षमता कमकुवत होते, जे पचन प्रक्रियेस धीमे करते. म्हणून, फळं खाणे आणि त्वरित पाणी पिण्यामुळे पोटात पेटके आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

अतिसार होऊ शकतो

टरबूज, काकडी, खरबूज, लीची अशा फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अशी फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास जुलाब किंवा अतिसार होऊ शकतो, कारण पचन प्रक्रिया नकारात्मक स्वरुपात अधिक वेगवान होते.

पोटाची पीएच पातळी बिघडते

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. पोटाची सामान्य पीएच पातळी आम्लीय असते, जी 1.5 ते 3.5 दरम्यान असते. तथापि, जर तुम्ही फळं खाल्ली आणि ताबडतोब पाणी प्यायलात तर पचन तंत्राची सामान्य आम्ल पातळी पाण्यात मिसळून कमी होते.

रक्तातील साखरेची पातळी वाढवते

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचन तंत्रामध्येच राहते. उर्वरित अन्न चरबीमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.

हे आजार होण्याची शक्यता

गोड फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे अपचन, खोकला किंवा साखरेची पातळी वाढण्याची शक्यता आसते, तर लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे घश्यात खवखव यासारखे त्रास होऊ शकतात. उदाहरणार्थ- पाण्यात लिंबू पिळणे ही वेगळी गोष्ट आहे आणि लिंबू चाटल्यानंतर पाणी पिण्याने शरीरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

इतर बातम्या

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.