AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Management: No GYM No Diet..! वजन कमी करण्यासाठी ‘ही’ घरगुती कामं ठरतील फायदेशीर

Weightloss Tips: जंक फूडमुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे तुमचं पण वजन वाढलंय का? तर अता कळजी करू नका. तुम्ही घर बसल्या बसल्या तुमचं वजन कमी करू शकता. घरातील काम केल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया घरातील काम करण्याचे फायदे.

Weight Management: No GYM No Diet..! वजन कमी करण्यासाठी 'ही' घरगुती कामं ठरतील फायदेशीर
| Edited By: | Updated on: Jan 29, 2025 | 3:50 PM
Share

तुम्ही पण वजन कमी करण्यासाठी तासंतास जिममध्ये घालवताय का? तुम्हाला पण डायटिंग करून कंटाळा आलाय का? आता घाबरू नका आज आपण जाणून घेणार आहोत की घरच्या घरी परंतु सोप्या पद्धतीनं वजन कमी कसं करायचं?  तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या घरातील काम करून देखील तुमचं वजन कमी करू शकता. होय तु्म्ही बरोबर ऐकले! वजन कमी करण्यासाठी असे अनेक घरगुती कामं आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्यासंबंधीत अनेक समस्या उद्भवतात. जंक फूडच्या अतिसेवनामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते ज्यामुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेसट्रॉल वाढल्यामुळे तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. परंतु काही घरगुती उपाय केल्यामुळे तुमचं वजन झटपट कमी होऊ शकतं.

वजन कमी करण्यासाठी घरगुती कामे कशी मदत करतात?

जेव्हा तुम्ही घरातील कामे करता तेव्हा तुमच्या शरीरातील अनेक स्नायूंची हालचाल होतात. तुम्ही जर भांडी धुत असाल, फरशी साफ करत असाल किंवा कपडे धुत असाल, प्रत्येक कामात तुमचे स्नायू सक्रिय असतात आणि तुमच्या शरीराची हालचाल होते यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे वजन कमी होऊ लागते.

कोणती घरगुती कामे वजन कमी करण्यास मदत करतात?

भांडी धुणे- भांडी धुताना तुमच्या हाताचे आणि मनगटाचे स्नायू खूप सक्रिय असतात. जर तुम्ही भांडी हाताने धुतली तर तुम्हाला शरीरातील कॅलरी वितळण्यास मदत होते आणि तुमच्या शशरीरातील हालचाल होते.

फरशी पुसणे – फरशी पुसताना तुमच्या कंबरेचे, पायांचे आणि हातांचे स्नायू सक्रिय करतात. जर तुम्ही फरशी झाडली किंवा पुसली तर तुमच्या शरीरातील अनेक कॅलरीज बर्न होतात.

कपडे धुणे – कपडे धुताना हात, मनगट आणि पाठीचे स्नायू सक्रिय असतात. जर तुम्ही कपडे हाताने धुतले तर तुमच्या शरीरातील जास्त प्रमणात कॅलरिज बर्न करण्यास मदत होते.

बागेची काळजी – बागेतील झाडांची काळजी घेताना तुमचे अनेक स्नायू काम करतात. तुम्ही माती खोदत असाल, झाडे लावत असाल किंवा गवत कापत असाल, प्रत्येक काम कॅलरी बर्न करते.

स्वयंपाक – स्वयंपाक करताना हात, मनगट आणि पाय यांचे स्नायू सक्रिय असतात. जर तुम्ही तुमचे स्वतःचे अन्न शिजवले तर तुम्ही निरोगी अन्न खाऊ शकता आणि त्याच वेळी कॅलरी बर्न करू शकता.

घरकामासोबत ‘या’ टिप्स करा फॉलो

पाणी प्या- दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे तुमचे चयापचय जलद राहते आणि तुमचे वजन कमी होते.

पूर्ण झोप घ्या- रोज 7-8 तासांची झोप घ्या. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि तुमचे वजन कमी होते.

तणाव कमी करा- तणावामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योगासने किंवा व्यायाम करण्यास फायदेशीर ठरेल.

डॉक्टरांचा सल्ला घ्या- जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर वजन कमी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.