रात्रभर एसीत झोपल्यावर काय होतं?; तुम्हालाही माहीत आहेत का या गोष्टी ?
हल्ली वाढलेल्या एसी वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय. एसीमुळे फुफ्फुसांना नुकसान, अलर्जी, ड्राय आयज, त्वचेची कोरडेपणा, पेशींची वेदना, मायग्रेन आणि श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एसीचा वापर मर्यादित करणे आणि फिल्टर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. योग्य वापराने आरोग्य समस्या टाळता येतात.
हल्ली एसी वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण तर एसीशिवाय झोपूच शकत नाही. एसीमध्ये झोपणं हे प्रतिष्ठेचं लक्षणही मानलं जात आहे. ऑफिसमध्ये आणि घरात दोन्ही ठिकाणी प्रत्येकाला एसीची गरज लागतेच लागते. काही लोकांच्या तर तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. झोपताना एसी लावला नाही तर अनेकांना गुदमरल्यासारखं होतं. त्यामुळे त्यांना एसी हवाच असतो. काही लोक तर थंडीत आणि पावसाळ्यातही घरातील एसी चालू ठेवतात. या सवयीमुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. चला, हे जाणून घेऊया की एसीमुळे शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतात:
फुफ्फुसांचे नुकसान :
एसीत जास्त वेळ राहिल्याने श्वास नलिकेत म्युकस जमतं आणि सर्दी-खोकल्याची समस्या होऊ शकते. रात्री एसीमध्ये झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी गळा कोरडा पडतो. किंवा अंग जड पडतं. काही लोकांना खोकला, हापण आणि सायनस संबंधित समस्या होऊ शकतात.
ॲलर्जी :
थंड वाऱ्यामुळेही ॲलर्जी होऊ शकते. श्वासातून किंवा डोळ्यातून पाणी येणे, चेहरा फुगणे, सतत शिंका येणे ही ‘कोल्ड अलर्जी’ ची लक्षणे असू शकतात. एसीच्या थंड वातावरणात अनेक दिवस राहिल्यामुळे हा त्रास वाढू शकतो.
ड्राय आयज (शुष्क डोळे) :
थंड वातावरणामुळे हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे डोळ्यात चुरचुरी किंवा जळजळ होऊ शकते. रात्री एसी चालवून झोपल्यास डोळ्यांच्या आर्द्रतेत घट होऊन ड्राय आयजची समस्या वाढू शकते.
त्वचेला इजा :
थंड वातावरणामुळे त्वचेचा मुलायमपणा कमी होतो, त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. तोंड आणि ओठ कोरडे होतात. अनेक वेळा थंड वातावरणामुळे त्वचेवर लाली येऊ शकते आणि त्वचेवर ताण यायला लागतो.
पेशींची वेदना :
थंड वातावरणामुळे रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात. यामुळे शरीराच्या विविध भागात वेदना, ताण किंवा पिळ येऊ शकतो.
मायग्रेनचा त्रास :
जास्त वेळ थंड वातावरणात राहिल्यास, आधीपासून मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना डोक्याचे दुखणे सहन करणे कठीण होऊ शकते.
COPD आणि श्वसनाच्या समस्या :
श्वसनाच्या समस्यांमध्ये असलेल्या लोकांना एसीमध्ये जास्त वेळ राहणे हानिकारक ठरू शकते. तसेच, एसीचा फिल्टर स्वच्छ नसल्यास धूळ आणि माती श्वसन नलिकेत जाऊ शकते. त्यामुळे फुफ्फुसांचा त्रास होऊ शकतो. याच कारणांमुळे, एसीचा वापर योग्य आणि कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीरावर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.