AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या चिकन खाण्याची योग्य पद्धत

वजन कमी करण्यासाठी चिकन हा निरोगी आणि चवदार पर्याय आहे. परंतु ते योग्यरीत्या शिजवणे आणि मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

चिकन खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या चिकन खाण्याची योग्य पद्धत
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 19, 2025 | 8:33 PM
Share

वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक वेळा त्यांचे आवडते पदार्थ खाणे सोडून देतात. पण जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला हे करण्याची अजिबात गरज नाही. चिकन खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. चिकन हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. हे खाल्ल्याने चयापचय क्रिया ही वाढते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चिकन मुळे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासही मदत होते.

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार चिकन मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरी कमी असतात. चिकन जर योग्य प्रकारे खाल्ले तर वजन कमी होण्यासही मदत होते. योग्य प्रकारे शिजवलेले चिकन आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर ते वजन नियंत्रित ठेवण्यात ही मदत करते.

वजन कमी करण्यासाठी कसे फायदेशीर आहे चिकन

1. चिकन मध्ये भरपूर प्रोटीन असते हे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही. 2. चिकन ब्रेस्टमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात. कमी कॅलरी वापरून तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकतात. 3. चिकन खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते जी वर्कआउट साठी खूप महत्त्वाचे असते.

चिकन कसे खावे?

चिकन शिजवण्याचा मार्ग वजन कमी करण्यावर देखील परिणाम करतो. जर तुम्ही तळलेले किंवा बटर असलेले चिकन खाल्ले तर ते तुम्हाला जास्त कॅलरीज देईल तसेच चरबी देखील देईल. जर तुम्ही असे चिकन खाल्ले तर तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्याऐवजी तुम्ही चिकन ग्रील करून, उकडून किंवा वाफवून खाऊ शकता.

मसाल्यांचा वापर

चिकन हेल्दी बनवण्यासाठी हळद, आले, लसूण, काळी मिरी आणि लिंबू यासारखे नैसर्गिक मसाले वापरा. हे मसाले केवळ चवच वाढवत नाही तर चयापचय देखील गतिमान करतात.

चिकन कधी खावे?

तुम्ही दुपारी चिकन खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास तसेच कॅलरी बर्न करण्यास मदत होते. व्यायामानंतर चिकन खाणे स्नायूंच्या रिकवरी खूप चांगली आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.