Pregnancy Tips | गर्भवती आईने केसर खाल्ल्याने मुलगा खरंच गोरा जन्माला येतो का? बघा तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात

आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक अतिशय मौल्यवान आणि सुंदर असा क्षण असतो. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वेगवगळ्या योजना आखत असतात. काहीजण आईच्या पोटात बाळ असतानाच तो गोरा रंगाचा जन्माला यावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

Pregnancy Tips | गर्भवती आईने केसर खाल्ल्याने मुलगा खरंच गोरा जन्माला येतो का? बघा तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 9:23 PM

Pregnancy Tips | देवाच्या दरबारात काळा-गोरा असा भेद नसतो, असं म्हटलं जातं. काळा आणि गोरा असा भेद करणं मुळातच चुकीचं आहे. माणसाचं अंतर्मण, त्याचा स्वभाव चांगला असायला हवा. माणसाचे गुण गोड असायला हवेत. रंग गोरा असला किंवा सावळा असला त्याने काहीच फरक पडत नाही. पण तरीही काही जण आपल्याला गोऱ्या रंगाचंच बाळ जन्माला यावं, अशी इच्छा मनाशी बाळगत असतात. त्यासाठी ते वेगवेगळे कृत्रिम उपाय राबवतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच असे प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण अशा प्रयोगांमधून काहीच सिद्ध होत नाही. याउलट अडचणींना सामोरं जाण्याची शक्यता जास्त असते.

काही लोकांचं म्हणणं असतं की आई गर्भवती असताना केसर खाललं तर तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ गोरं जन्माला येतं. सोशल मीडियावर अशी माहिती देणारे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात, ज्यामध्ये प्रेग्नेंसीच्या बद्दल वेगवेगळे दावे केले जातात. काही व्हिडीओंमध्ये तर असाही दावा केला जातो की, आईच्या पोटाचा आकार बघून मुलाचं लिंग कोणतं आहे ते समजतं. पण या प्रकारच्या सर्व गोष्टी या अफवा आहेत, असं डॉक्टरांचं मत असतं. याबाबत डॉक्टरांचं मत जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

दिल्लीच्या फोर्टिस ला फेम हॉस्पिटलचे ऑब्सटेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. वंदना सोढी यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “केसर खाल्ल्याने बाळाच्या रंगात कोणताच फरक पडत नाही. केसर खाल्ल्याने गोरा रंगाचं बाळ जन्माला येतं असं म्हणणं चुकीचं आहे. त्याला वैज्ञानिक असं कोणतंही कारण नाही. तसं ते विज्ञानात सिद्धदेखील झालेलं नाही. बाळाचे केस, त्वचा आणि डोळ्यांचा रंग हा अनुवंशिकतेवर आधारित असतो”, असं तज्ज्ञ डॉक्टर वंदना सोढी यांनी सांगितलं.

गर्भवती महिलांनी संतुलित आणि पोषक तत्वांनी भरपूर असा आहार घ्यायला हवा. त्यांना प्रत्येक दिवशी 200 अतिरिक्त कॅलिरीजची आवश्यकता असते. पण याचा अर्थ असा नाही की गर्भवती महिलांनी दोन जणांचं जेवण एकाचवेळी खायला हवं. गर्भवती महिलांनी फळे, पालेभाज्या खायला हव्यात. तसेच जंकफूड खाण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.